RR vs SRH IPL 2021 Match 28 | राजस्थानचा सनरायजर्स हैदराबादवर 55 धावांनी ‘रॉयल’ विजय
RR vs SRH 2021 Live Score Marathi | राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने
नवी दिल्ली | राजस्थान रॉयल्सने (Rajastha Royals) सनरायजर्स हैदराबादवर (Sunrisers Hyderabad) 55 धावांनी शानदार विजय मिळवला आहे. राजस्थानने हैदराबादला विजयासाठी 221 धावांचे आव्हान दिले होते. मात्र हैदराबादला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 165 धावाच करता आल्या. हैदराबादकडून मनिष पांडेने 31 तर जॉनी बेयरस्टोने 30 धावांची खेळी केली. राजस्थानकडून मुस्तफिजुर रहमान आणि ख्रिस मॉरीसने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. या मॅचचे आयोजन नवी दिल्लीतील (Arun Jaitley Stadium) अरुण जेटली स्टेडियममध्ये करण्यात आले होते. (rr vs srh live score ipl 2021 match rajasthan royals vs sunrisers hyderabad scorecard online arun jaitley stadium delhi in marathi)
Key Events
राजस्थानकडून जोस बटलरने 124 धावांची शानदार शतकी खेळी केली. बटलरने 64 चेंडूत 11 चौकार आणि 8 सिक्ससह 124 धावांची वादळी खेळी केली. त्यासोबतच कर्णधार संजू सॅमसनने 48 रन्स केल्या
राजस्थानने हैदराबादला पराभूत करत तिसऱ्या विजयाची नोंद केली आहे. यासह राजस्थानने पॉइंट्सटेबलमध्ये 7 व्या क्रमांकावरुन 6 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. राजस्थानच्या नावावर 7 सामन्यात 4 पराभव आणि 3 विजयासह 6 गुणांची नोंद आहे.
LIVE Cricket Score & Updates
-
राजस्थानची हैदराबादवर 55 धावांनी मात
राजस्थानने हैदराबादवर 55 धावांनी मात केली आहे. राजस्थानने हैदराबादला विजयासाठी 221 धावांचे आव्हान दिले होते. पण हैदराबादला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 165 धावाच करता आल्या. हैदराबादकडून मनिष पांडेने 31 तर जॉनी बेयरस्टोने 30 धावांची खेळी केली. राजस्थानकडून मुस्तफिजुर रहमान आणि ख्रिस मॉरीसने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.
Match 28. It's all over! Rajasthan Royals won by 55 runs https://t.co/MK5XU4ASi5 #RRvSRH #VIVOIPL #IPL2021
— IndianPremierLeague (@IPL) May 2, 2021
-
हैदराबादला आठवा धक्का
हैदराबादने आठवी विकेट गमावली आहे. राशिद खान भोपळा न फोडता तंबूत परतला आहे.
-
-
हैदराबादला सातवा धक्का
हैदराबादने केदार जाधवच्या रुपात सातवी विकेट गमावली आहे. जाधवने 19 धावांची खेळी केली.
-
हैदराबादला सहावा झटका
हैदराबादला सहावा झटका बसला आहे. अब्दुल समद 10 धावांवर आऊट झाला आहे.
-
हैदराबादला पाचवा झटका
हैदराबादला पाचवा झटका लागला आहे. मोहम्मद नबी 17 धावा करुन आऊट झाला आहे.
-
-
मोहम्मद नबीचे 2 खणखणीत सिक्स
मोहम्म्द नबीने 14 व्या ओव्हरमध्ये राहुल तेवतियाच्या गोलंदाजीवर 2 खणखणीत सिक्स लगावले आहेत.
-
हैदराबादला मोठा झटका
हैदराबादला मोठा झटका लागला आहे. कर्णधार केन विलियमनस 21 धावा करुन आऊट झाला आहे.
-
हैदराबादचा 12 ओव्हरनंतर स्कोअर
हैदराबादने 12 ओव्हरनंतर 3 विकेट्स गमावून 100 धावा पूर्ण केल्या आहेत. मैदानात कर्णधार केन विलियमसन आणि केदार जाधव खेळत आहेत. हैदराबादला विजयासाठी 8 ओव्हरमध्ये आणखी 121 धावांची गरज आहे.
-
हैदराबादला तिसरा झटका
हैदराबादने तिसरी विकेट गमावली आहे. विजय शंकर आऊट झाला आहे. शंकरने 8 धावा केल्या. -
हैदराबादला दुसरा झटका
हैदराबादने दुसरी विकेट गमावली आहे. जॉनी बेयरस्टो कॅच आऊट झाला आहे. बेयरस्टोने 30 धावांची खेळी केली. -
हैदराबादला पहिला धक्का
हैदराबादने पहिली विकेट गमावली आहे. मनिष पांडे आऊट झाला आहे. मुस्तफिजुर रहमानने मनिषला 31 धावांवर बोल्ड केलं.
Match 28. 6.1: WICKET! M Pandey (31) is out, b Mustafizur Rahman, 57/1 https://t.co/MK5XU4ASi5 #RRvSRH #VIVOIPL #IPL2021
— IndianPremierLeague (@IPL) May 2, 2021
-
हैदराबादचा पावर प्लेनंतर स्कोअर
हैदराबादने पावर प्लेच्या पहिल्या 6 ओव्हरमध्ये बिनबाद 57 धावा केल्या आहेत. हैदराबादला विजयासाठी 84 चेंडूत आणखी 164 धावांची आवश्यकता आहे.
No wickets in the Powerplay and #SRH are 57-0. They need 164 runs in 84 balls. https://t.co/7vPWWkuPYu #RRvSRH #VIVOIPL pic.twitter.com/45SESHQuK4
— IndianPremierLeague (@IPL) May 2, 2021
-
हैदराबादच्या सलामी जोडीची अर्धशतकी भागीदारी
सनरायजर्स हैदराबादच्या जॉनी बेयरस्टो आणि मनिष पांडे सलामी जोडीने अर्धशतकी भागीदारी केली आहे.
-
हैदराबादची शानदार सुरुवात
विजयी धावांचे पाठलाग करताना हैदराबादची शानदार सुरुवात झाली आहे. जॉनी बेयरस्टो-मनिष पांडे सलामी जोडीने 5 ओव्हरमध्ये बिनबाद 46 धावा केल्या आहेत.
-
हैदराबादच्या बॅटिंगला सुरुवात, विजयासाठी 221 धावांची आवश्यकता
हैदराबादच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. मनिष पांडे आणि जॉनी बेयरस्टो सलामी जोडी मैदानात खेळत आहे. हैदराबादला विजयासाठी 221 धावांची आवश्यकता आहे.
-
हैदराबादला विजयासाठी 221 धावांचे तगडे आव्हान
राजस्थानने हैदराबादला विजयासाठी 221 धावांचे आव्हान दिले आहे. राजस्थानने 20 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 220 धावा केल्या. राजस्थानकडून सर्वाधिक 124 धावा सलामीवीर जॉस बटलरने केल्या. तर संजू सॅमसनने 48 धावांची खेळी केली. तर हैदराबादकडून राशिद खान, संदीप शर्मा आणि विजय शंकरने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
Innings Break: A fiery 124 off just 64 balls from @josbuttler and @IamSanjuSamson's 48 powers @rajasthanroyals to a commanding 220-3 in 20 overs.
This is the second joint-highest total in #IPL2021. https://t.co/7vPWWkuPYu #RRvSRH #VIVOIPL pic.twitter.com/6hXpWCDuww
— IndianPremierLeague (@IPL) May 2, 2021
-
राजस्थानला तिसरा धक्का
राजस्थानने तिसरी विकेट गमावली आहे. शतकवीर जॉस बटलर आऊट झाला आहे. बटलरने 64 चेंडूत 11 चौकार आणि 8 सिक्ससह 124 धावांची झंझावाती खेळी केली.
-
जोस बटलरचा सिक्स, राजस्थान 200 पार
जोस बटलरने 19 व्या ओव्हरच्या 5 व्या चेंडूवर संदीप शर्माच्या बोलिंगवर सिक्स लगावला. यासह राजस्थानने 200 धावांचा टप्पा ओलांडला.
-
जॉस बटलरचे अफलातून शतक
राजस्थानचा सलामीवीर जॉस बटलरने 56 चेंडूत अफलातून शतक लगावलं आहे. जोसच्या आयपीएल कारकिर्दीतील हे पहिलंवहिलं शतक ठरलं. जोस या मोसमात संजू सॅमसन, देवदत्त पडीक्कलनंतर शतक लगावणारा तिसरा शतकवीर ठरला.
1️⃣0️⃣0️⃣???@josbuttler brings up his maiden #VIVOIPL century in just 56 balls (10×4, 5×6). He is the 2nd @rajasthanroyals to get to triple figures this season!https://t.co/7vPWWkMqQ2 #RRvSRH #VIVOIPL pic.twitter.com/Kh3Aa2Du6J
— IndianPremierLeague (@IPL) May 2, 2021
-
राजस्थानला दुसरा झटका
राजस्थानला दुसरा झटका बसला आहे. कर्णधार संजू सॅमसन कॅच आऊट झाला आहे. संजूने 48 धावांची खेळी केली.
-
15 व्या ओव्हरमधून 21 धावा
राजस्थान रॉयल्सने 15 व्या ओव्हरमध्ये 21 धावा चोपल्या आहेत. यामध्ये जॉस बटलरने 2 सिक्स आणि 2 फोर लगावले. तर संजू सॅमसनने 1 धाव काढली.
#SRH have introduced Mohammad Nabi into the attack and Buttler hits him for 2×4, 2×6. Nabi concedes 21 in his first over. #RR now move to 146-1. https://t.co/7vPWWkMqQ2 #RRvSRH #VIVOIPL pic.twitter.com/A3FoGqizkg
— IndianPremierLeague (@IPL) May 2, 2021
-
जॉस बटलर-संजू सॅमसन जोडीची शतकी भागीदारी
जॉस बटलर आणि संजू सॅमसन जोडीने दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली आहे. या दोघांनी अवघ्या 68 चेंडूत दुसऱ्या विकेटसाठी 100 धावा जोडल्या. राजस्थानचा 14 ओव्हरनंतर 1 विकेट 125 रन असा स्कोअर झाला आहे.A partnership that @rajasthanroyals fans will savour.
Buttler-Samson bring up the 100-run stand in only 68 balls. 14 runs in the 14th over and #RR are 125-1.https://t.co/7vPWWkMqQ2 #RRvSRH #VIVOIPL pic.twitter.com/YJONgu4Q7w
— IndianPremierLeague (@IPL) May 2, 2021
-
सिक्स खेचत जोस बटलरचे शानदार अर्धशतक
जोस बटलरने सामन्यातील 13 व्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर संदीप शर्माच्या गोलंदाजीवर सिक्स लगावला. यासह बटलरने 39 चेंडूत शानदार अर्धशतक पूर्ण केलं. -
राजस्थानचा 10 ओव्हरनंतर स्कोअर
राजस्थानने 1 विकेट गमावून 10 ओव्हरमध्ये 77 धावा केल्या आहेत. जोस बटलर 32 आणि संजू सॅमसन 25 धावांवर नाबाद खेळत आहेत.
-
मनिष पांडेकडून संजू समॅसनला जीवनदान
मनिष पांडेने संजू सॅमसनला 23 धावांवर जीवनदान दिले आहे. संदीप शर्मा सामन्यातील 10 वी ओव्हर टाकत होता. या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर संजूने शॉट मारला. संजूने मारलेला चेंडू मनिषच्या दिशेने गेला. मात्र मनिषने सोप्पा कॅच सोडला.
-
राजस्थानची दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी
जोस बटलर-संजू सॅमसन जोडीने दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली आहे. अवघ्या 31 चेंडूंच्या मदतीने या दोघांनी ही भागीदारी केली आहे.
Partnership: 50*Balls: 31
ONE GIF to describe the Jos & Sanju partnership so far! ?#HallaBol | #RoyalsFamily | #RRvSRH
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 2, 2021
-
राजस्थानचा पावर प्लेनंतरचा स्कोअर
राजस्थान रॉयल्सने पावर प्लेच्या 6 ओव्हरमध्ये 1 विकेट्स गमावून 42 धावा केल्या आहेत. संजू सॅमसन 8* आणि जोस बटलर 17 धावांवर नाबाद खेळत आहेत.
-
संजू सॅमसनचा जोरदार सिक्स
संजू सॅमसनने षटकार ठोकत सुरुवात केली. संजूने खलील अहमदच्या गोलंदाजीवर चौथ्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर सिक्स लगावला.
-
राजस्थानला पहिला धक्का
राजस्थानने पहिली विकेट गमावली आहे. युवा यशस्वी जयस्वाल एलबीडब्ल्यू आऊट झाला. राशिद खानने जयस्वालला आऊट केलं. यशस्वीने 12 धावा केल्या.
-
राजस्थान रॉयल्सच्या बॅटिंगला सुरुवात
राजस्थान रॉयल्सच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. जोस बटलर-यशस्वी जयसवाल सलामी जोडी मैदानात खेळत आहे.
-
अनुज रावतचे आयपीएल पदार्पण
राजस्थान रॉयल्सकडून युवा अनुज रावतने पदार्पण केलं आहे. त्याला सामन्याआधी राजस्थानची कॅप देऊन त्याचं स्वागत करण्यात आलं. या सर्व प्रकाराचा एक व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे.
.@AnujRawat_1755 is all set to make his #VIVOIPL debut ?? #RRvSRH pic.twitter.com/ZaorKs8ZWY
— IndianPremierLeague (@IPL) May 2, 2021
-
राजस्थान रॉयल्सचे अंतिम 11 खेळाडू
संजू सैमसन (कर्णधार आणि विकेटकीपर), जॉस बटलर, यशस्वी जयस्वाल, डेव्हिड मिलर, रियान पराग, राहुल तेवतिया, अनुज रावत, ख्रिस मॉरिस, मुस्तफिजुर रहमान, चेतन साकरिया आणि कार्तिक त्यागी.
Match 28. Rajasthan Royals XI: J Buttler, Y Jaiswal, S Samson, A Rawat, D Miller, R Parag, R Tewatia, C Morris, K Tyagi, C Sakariya, M Rahman https://t.co/MK5XU4ASi5 #RRvSRH #VIVOIPL #IPL2021
— IndianPremierLeague (@IPL) May 2, 2021
-
सनरायजर्स हैदराबादची प्लेइंग इलेव्हन
केन विलियमसन (कर्णधार), जॉनी बेयरेस्टो (विकेटकीपर), विजय शंकर, केदार जाधव, मनीष पांडे, अब्दुल समद, राशिद खान, मोहम्मद नबी, संदीप शर्मा, खलील अहमद आणि भुवनेश्वर कुमार.
Match 28. Sunrisers Hyderabad XI: A Samad, J Bairstow, K Williamson, M Pandey, V Shankar, M Nabi, K Jadhav, R Khan, S Sharma, B Kumar, K Ahmed https://t.co/MK5XU4ASi5 #RRvSRH #VIVOIPL #IPL2021
— IndianPremierLeague (@IPL) May 2, 2021
-
हैदराबादने टॉस जिंकला
सनरायजर्स हैदराबादने टॉस जिंकला आहे. नाणेफेक जिंकून कर्णधार केन विलियमसनने फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राजस्थान पहिले बॅटिंग करणार आहे.
Match 28. Sunrisers Hyderabad win the toss and elect to field https://t.co/MK5XU4ASi5 #RRvSRH #VIVOIPL #IPL2021
— IndianPremierLeague (@IPL) May 2, 2021
-
राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने
आयपीएलच्या 14 व्या मोसमात आज (2 मे) दुहेरी थरार रंगणार आहे. या डबल हेडरमधील पहिला सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात खेळवण्यात येणार आहे.
Welcome to the first game of Double-header Sunday ☀️?@rajasthanroyals take on @SunRisers in Match 2️⃣8️⃣ of the #VIVOIPL
Who will come out on top – ? OR ?❓ #RRvSRH pic.twitter.com/oGlGzuiqGz
— IndianPremierLeague (@IPL) May 2, 2021
Published On - May 02,2021 7:18 PM