Cricket | पावसाची जोरदार बॅटिंग, पहिला एकदिवसीय सामना अखेर रद्द
कसोटी सामन्यानंतर उभय संघात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील पहिला सामना हा पावसामुळे रद्द झालाय. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांचा हिरमोड झाला आहे.
मुंबई | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना हा शुक्रवारी 17 मार्च रोजी खेळवण्यात येणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यावर पावसाचं सावट आहे. राज्यासह मुंबईतही पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पावसाच्या या टांगत्या तलवारीमुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. तर दुसऱ्या बाजूला मात्र पावसामुळे पहिला वनडे सामना हा रद्द करण्यात आल्याची माहिती आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने दिली आहे.आयसीसीने ट्विटद्वारे याबाबत सांगितलंय.
कसोटी मालिकेनंतर दक्षिण आफ्रिका विरुद्ध विंडिज यांच्यात आज 3 सामन्यातील सलामीचा सामना आज 16 मार्च रोजी खेळवण्यात येणार होता. मात्र पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे पहिला सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पाऊस इतका होता की टॉस ही होऊ शकला नाही. यावरुन पावसाची तीव्रता लक्षात येऊ शकते. दरम्यान या मालिकेतील दुसरा सामना हा बफेलो पार्क इस्ट लंडन इथेच खेळवण्यात येणार आहे.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध विंडिज पहिला सामना रद्द
The first #SAvWI ODI has been called off without a ball being bowled due to persistent rain ?
?: @ProteasMenCSA pic.twitter.com/ps86rxRk0A
— ICC (@ICC) March 16, 2023
कसोटी मालिकेत काय झालं?
दरम्यान याआधी पार पडलेल्या 2 सामन्यांची कसोटी मालिका दक्षिण आफ्रिकेने 2-0 अशी जिंकून विंडिजला व्हाईट वॉश दिला. दक्षिण आफ्रिकेने विंडिजवर सेंच्युरियन इथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात 87 धावांनी पराभूत केलं. तर जोहान्सबर्ग इथे झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये विंडिजवर 284 धावांच्या मोठ्या फरकाने मात केली.
तर आता पहिला वनडे सामना हा पावसामुळे रद्द झाला आहे. यामुळे आता ही मालिका जिंकण्यासाठी दोन्हीपैकी कोणत्याही एका टीमला सलग 2 सामने जिंकावे लागणार आहेत. यामुळे या मालिकेत चांगलीच रंगत पाहायला मिळणार आहे.
दक्षिण आफ्रिका टीम | टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, रॅसी व्हॅन डर डुसेन, ट्रिस्टन स्टब्स, टोनी डी झोर्झी, अँडीले फेहलुकवायो, गेराल्ड कोएत्झी, सिसांडा मॅगाला, ब्योर्न फोर्टुइन, लुंगी एनगिडी, विल्यम पाराझा, लिनेझाड , तबरेझ शम्सी आणि रायन रिकेल्टन.
विंडिज टीम | शाई होप (कॅप्टन आणि विकेटकीपर), कायल मेयर्स, शामरह ब्रूक्स, ब्रँडन किंग, निकोलस पूरन, केसी कार्टी, जेसन होल्डर, रोमॅरियो शेफर्ड, अकेल होसेन, अल्झारी जोसेफ, यानिक कॅरिया, रोव्हमन पॉवेल, रोस्टन चेस, ओडियन स्मिथा आणि शॅनोन गॅब्रिएल.