मुंबई: के.एल.राहुलची (KL Rahul) दुखापत ही टीम इंडियासाठी एक झटका आहे. आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेच्या आधीपासून राहुलला ही दुखापत झाली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी 20 सामन्यातून त्याने माघार घेतली, तेव्हा राहुलला झालेली ग्रोइन इंजरी सामान्य आहे, असं वाटलं. पण नंतर राहुल इंग्लंड (England Tour) विरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात खेळणार नसल्याचं समोर आलं. त्यानंतर तो इंग्लंड विरुद्धच्या वनडे आणि टी 20 मालिकेतच खेळू शकणार नसल्याच कळलं, त्यावेळी राहुलला झालेली दुखापत किती गंभीर आहे, ते लक्षात आलं. के एल राहुलला आधी रिकव्हरीसाठी नॅशनल क्रिकेट अॅकेडमी बंगळुरु येथे पाठवण्यात आलं होतं. पण आता त्याला अधिक चांगल्या, प्रभावी उपचारांसाठी जर्मनीला पाठवण्यात आलं आहे. जुलै महिन्यात वेस्ट इंडिज विरुद्ध होणाऱ्या मालिकेआधी स्वत:ला पूर्ण फिट करणं, हेच आता राहुल समोरचं लक्ष्य असेल.
मायदेशात परतण्याधी केएल राहुल महिनाभर उपचारासाठी जर्मनी मध्ये रहाणार असल्याची माहिती आहे. त्यानंतर तो वेस्ट इंडिज टूरसाठी भारतीय संघात दाखल होईल. “ग्रोइन दुखापतीमधून सावरण्यासाठी राहुलला एका पूर्ण रिहॅब प्रोग्रॅमची गरज आहे. मागच्या काही महिन्यापासून त्याला ग्रोइन इंजरीमुळे दु:खत होतं. आयपीएल 2022 च्या वेळी सुद्धा त्रास होत होता. पण दुखापत इतकी गंभीर नव्हती. वेस्ट इंडिज दौऱ्याआधी तो वेळेवर फिट होईल, अशी अपेक्षा करुया” असं केएल राहुलच्या एका जवळच्या सूत्राने इनसाइड स्पोर्टला सांगितलं.
दुखापतीमुळे केएल राहुलला मागच्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेला मुकाव लागलं होतं.
हॅमस्ट्रिंच्या दुखापतीमुळे तो फेब्रुवारी महिन्यात वेस्ट इंडिज विरुद्ध झालेल्या टी 20 मालिकेत खेळू शकला नाही.
वेळेवर फिट होऊ न शकल्यामुळे तो फेब्रुवारी महिन्यातच श्रीलंकेविरुद्धच्या टी 20 मालिकेतही खेळू शकला नाही.
मार्च महिन्यात हॅमस्ट्रिंगच्याच दुखापतीमुळे त्याला श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत खेळता आलं नाही.
जून 2022 मध्ये ग्रोइन इंजरीमुळे केएल राहुल दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड विरुद्धच्या मालिकेला मुकला आहे.