IND vs WI : बडे दिलवाला! ऋतुराजसाठी हिटमॅन ‘वन-डाऊन’ येणार, आवेश खानचं पदार्पण
वनडे सीरीजप्रमाणे टी-20 मध्येही क्लीन स्वीप करण्याचा भारताचा प्रयत्न असेल. याआधी वनडे मालिकेत भारताने 3-0 असं निर्भेळ यश संपादन केलं होतं. दरम्यान, तिसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी भारतीय टीम मॅनेजमेंटने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिज (INDvsWI) यांच्यात आज शेवटचा तिसरा टी-20 सामना खेळवला जाणार आहे. भारताने टी-20 मालिकेत आधीच 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आजचा सामना भारताच्या दृष्टीने औपचारिकता आहे. पण वेस्ट इंडिज आजचा सामना जिंकून किमान प्रतिष्ठा राखण्याचा प्रयत्न करेल. वनडे सीरीजप्रमाणे टी-20 मध्येही क्लीन स्वीप करण्याचा भारताचा प्रयत्न असेल. याआधी वनडे मालिकेत भारताने 3-0 असं निर्भेळ यश संपादन केलं होतं. तिसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी भारतीय टीम मॅनेजमेंटने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. विराट कोहली, (Virat kohli) ऋषभ पंत आणि शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) या तिघांना विश्रांती दिली आहे. त्यामुळे आजच्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या तिसऱ्या आणि श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 सीरीजमध्ये हे तिघेही खेळताना दिसणार नाहीत. भारताने मालिका आधीच जिंकली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात भारतीय संघात चार बदल पहायला मिळणार आहेत.
ऋतुराज गायकवाडला संधी
भारताने दुसऱ्या टी-20 सामन्यात संघात कोणतेही बदल केले नव्हते. पण मालिकेत विजयी आघाडी घेतल्यामुळे आता तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने चार बदल केले आहेत. आज महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडला संघात संधी देण्यात आली आहे. स्थानिक क्रिकेट स्पर्धा आणि मागच्या आयपीएल सीजनमध्ये सर्वाधिक धावा करुनही ऋतुराजला संधी मिळत नव्हती. गेले दोन तीन महिने तो बेंचवर बसून होता. अखेर आज त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार आहे. तसेच नाणेफेक झाल्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माने इयन बिशप यांच्यासोबत बोलताना सांगितले की, आजच्या सामन्यात ऋतुराज गायकवाड आणि इशान किशन दोघे सलामीला उतरतील. तर ऋतुराजसाठी रोहित तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल.
आवेश खानचं पदार्पण
गोलंदाजांमध्ये आजच्या सामन्यात आवेश खान आणि शार्दुल ठाकूर या दोन खेळाडूंना संधी मिळाली आहे. दुसऱ्या सामन्यात शार्दुलला विश्रांती देण्यात आली होती. सातत्याने क्रिकेट खेळत असलेल्या भुवनेश्वर कुमार आणि युजवेंद्र चहलला विश्रांती देऊन आवेश खान आणि शार्दुल ठाकूर या दोन वेगवान गोलंदाजांना आज प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करणारा वेगवान गोलंदाज आवेश खान आजच्या सामन्याद्वारे टीम इंडियात पदार्पण करत आहे.
तिसऱ्या टी-20 सामन्यासाठी भारताची प्लेईंग इलेव्हन
ऋतुराज गायकवाड, इशान किशन, रोहित शर्मा (कर्णधार), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, वेंकटेश अय्यर, दीपक चाहर, हर्षल पटेल, शार्दुल ठाकूर, आवेश खान, रवी बिष्णोई
Four changes for #TeamIndia in the Playing XI.
Live action coming up shortly https://t.co/2nbPwMZwOW #INDvWI @Paytm pic.twitter.com/Kxr0zjpAir
— BCCI (@BCCI) February 20, 2022
नाणेफेक जिंकून कायरन पोलार्डचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय
वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरन पोलार्डने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Kieron Pollard calls it right at the toss and West Indies will bowl first in the final T20I.
Ishan Kishan and Ruturaj Gaikwad to open for #TeamIndia.
Live – https://t.co/e1c4fOY0JR #INDvWI @Paytm pic.twitter.com/neUc2V1PX6
— BCCI (@BCCI) February 20, 2022
वेस्टइंडीजची प्लेइंग इलेवन
शाय होप, काइल मेयर्स, निकोलस पूरन, रॉस्टन चेज, रॉवमॅन पॉवेल, कायरन पोलार्ड, जेसन होल्डर, रोमारियो शेफर्ड, फिन अॅलन, डी. ड्रेक्स, एच. वॉल्श
इतर बातम्या
IND vs WI 3rd T20, LIVE Score: नाणेफेक जिंकून कायरन पोलार्डचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय