INDvsWI : वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर रोहितच्या जागेवर ‘हा’ हिटर असणार शुबमनचा जोडीदार!
12 जुलैपासून टीम इंडियाच संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर असून 2 कसोटी. 3 एकदिवसीय सामने आणि 5 टी-20 सामन्यांची मालिका होणार आहे. सलामीवीर शुबमन गिल याच्यासोबत हा खेळाडू आपल्याला ओपिनिंगला खेळताना दिसण्याची शक्यता आहे.
मुंबई : टीम इंडियाचे खेळाडू आपल्या घरच्यांसोबत वेळ घालवत आहेत. येत्या महिन्यापासून खेळाडूंचं शेड्यूल व्यस्त असणार आहे. 12 जुलैपासून टीम इंडियाच संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर असून 2 कसोटी. 3 एकदिवसीय सामने आणि 5 टी-20 सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेसाठी अद्याप संघ जाहीर करण्यात आला नसला तरी या दौऱ्यावर टीम इंडियाचा युवा खेळाडूला ओपनिंगला पाठवलं जावू शकतं. सलामीवीर शुबमन गिल याच्यासोबत हा खेळाडू आपल्याला ओपिनिंगला खेळताना दिसण्याची शक्यता आहे.
नेमका कोण आहे हा खेळाडू?
कर्णधार रोहित शर्मा याचा आताचा फॉर्म पाहता त्याला वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी विश्रांती दिली जावू शकते. बीसीसीआयने या दौऱ्यासाठीचा संघ अद्याप जाहीर केला नाही. मात्र आयपीएल आणि आता सुरू असलेल्या महाराष्ट्र प्रीमिअर लीगमध्ये हा खेळाडू खोऱ्याने धावा काढताना दिसत आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून मराठमोळा खेळाडू ऋतुराज गायकवाड आहे.
आता झालेल्या आयपीएलमध्ये ऋतुराज गायकवाड याने झंझावती खेळी केल्या. यामध्ये अनेकवेळा त्याच्या खेळीने सीएसके संघाने विजय संपादित केला. गायकवाडची फलंदाजी दिवसेंदिवस बहरत चाललेली दिसत आहे. आयपीएलनंतरही त्याचा फॉर्म तसाच असून आता सुरू असलेल्या महाराष्ट्र प्रीमिअर लीगमध्येही त्याने शतक ठोकलं आहे.
रोहित शर्मा याला जर विश्रांती दिली तर त्याच्या जागी ऋतुराजला संधी मिळू शकते. यंदा एकदिवसीय वर्ल्ड कप होणार असून त्यासाठी जास्त दगदग होऊ नये म्हणूनही त्याला आराम दिला जाण्याची शक्यता आहे. ऋतुराज गायकवाड याच्या टीम इंडियाचं भविष्य म्हणून पाहिलं जातं. त्यामुळे गिलसोबत सलामीला गायकवाडही येण्याची शक्यता आहे.