S. Sreesanth ची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, पुढच्या पिढीसाठी कारकीर्द संपवण्याचा निर्णय

विविध वादांमुळे नेहमीच चर्चेत असणारा भारताचा जलदगती गोलंदाज एस. श्रीशांतने (S Sreesanth) सर्व प्रकारच्या देशांतर्गत क्रिकेटमधून (Domestic Cricket - first-class & all formats) निवृत्तीची घोषणा केली आहे.

S. Sreesanth ची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, पुढच्या पिढीसाठी कारकीर्द संपवण्याचा निर्णय
S Sreesanth announces retirementImage Credit source: File
Follow us
| Updated on: Mar 09, 2022 | 8:01 PM

मुंबई : विविध वादांमुळे नेहमीच चर्चेत असणारा भारताचा जलदगती गोलंदाज एस. श्रीशांतने (S Sreesanth) सर्व प्रकारच्या देशांतर्गत क्रिकेटमधून (Domestic Cricket – first-class & all formats) निवृत्तीची घोषणा केली आहे. क्रिकेटपटूंच्या पुढच्या पिढीसाठी मी माझी प्रथम श्रेणी क्रिकेट कारकीर्द संपवण्याचा निर्णय घेतला आहे, असं त्याने त्याच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्याने पुढे लिहिलं आहे की, “निवृत्तीचा (Retirement) हा निर्णय माझा एकट्याचा आहे आणि मला माहित आहे की यामुळे मला आनंद मिळणार नाही, पण माझ्या आयुष्यातील अशा वेळी योग्य निर्णय घेणे ही सन्माननीय कृती आहे. मी प्रत्येक क्षणाची कदर केली आहे,”

श्रीशांतने ट्विटमध्ये लिहिलं आहे की, आजचा दिवस माझ्यासाठी कठीण आहे, पण हा दिवस चिंतन आणि कृतज्ञतेचाही आहे. Ecc, एर्नाकुलम जिल्ह्यासाठी खेळणे, वेगळे असते. लीग आणि टूर्नामेंट संघ, केरळ राज्य क्रिकेट असोसिएशन, BCCI, Warwickshire county cricket team, भारतीय एअरलाइन्स क्रिकेट संघ, बीपीसीएल आणि ICC साठी खेळणं माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे.

क्रिकेटपटू म्हणून माझ्या 25 वर्षांच्या कारकिर्दीत, स्पर्धा, उत्कटता आणि चिकाटी या सर्वोच्च मापदंडांसह तयारी आणि प्रशिक्षण घेत असताना मी नेहमीच यश आणि क्रिकेट सामने जिंकण्याचा प्रयत्न केला आहे. माझे कुटुंब, माझे सहकारी आणि भारतातील लोकांचे प्रतिनिधित्व करणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. खूप दुःखाने पण खेद न बाळगता, मी जड अंत:करणाने हे सांगतो, मी देशांतर्गत (प्रथम श्रेणी आणि सर्व फॉरमॅट) क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे.

क्रिकेटपटूंच्या पुढच्या पिढीसाठी, मी माझी प्रथम श्रेणी क्रिकेट कारकीर्द संपवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय माझा एकट्याचा आहे आणि जरी मला माहित आहे की यामुळे मला आनंद मिळणार नाही, पण मी योग्य वेळी हा निर्णय घेत आहे, ही एक सन्माननीय कृती आहे. मी प्रत्येक क्षणाची कदर केली आहे.

श्रीशांतचे देशांतर्गत क्रिकेट कारकीर्द

श्रीसंत केरळकडून 2020/21 च्या सीजनमध्ये खेळला होता. श्रीसंत किंग्ज इलेव्हन पंजाब आणि कोची टस्कर्स केरळकडून खेळला आहे. टी-20 स्पर्धेत 44 सामन्यात त्याने 40 विकेट घेतल्यात. 2007 च्या टी-20 वर्ल्डकप विजेत्या संघाचा श्रीसंत भाग होता. श्रीसंतने 10 टी-20 सामन्यात 7 विकेट काढल्या आहेत. 65 टी-20 सामन्यांमध्ये त्याने 54 विकेट काढल्यात.

श्रीशांतची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरी

श्रीशांतने 27 कसोटी सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे. त्यात 87 विकेट्स त्याच्या नावावर आहेत. तर 53 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 75 बळी घेतले आहेत. त्याने 10 टी-20 सामन्यांमध्ये 7 विकेट्स घेतल्या आहेत

इतर बातम्या

Dhoni-Sakshi: साक्षी धोनीने सांगितले एमएस धोनीची पत्नी असण्याचे साइड-इफेक्टस

‘अश्विनबद्दल बोलताना रोहितची जीभ घसरली’, जाणून घ्या नेमकं प्रकरण

ICC Test Rankings: सुपर परफॉर्मन्सने बापूने दिग्ग्जांना दिला झटका, विराट-रोहितला मागे टाकून बनला नंबर 1

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.