SA vs AFG Semi Final Toss: अफगाणिस्तानने टॉस जिंकला, राशिद खानचा निर्णय काय?
South Africa vs Afghanistan Semi Final Toss: अफगाणिस्तानच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. पाहा दोन्ही संघांची प्लेइंग ईलेव्हन.
आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील पहिल्या सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान आमनेसामने आहेत. या सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 6 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 5 वाजून 32 मिनिटांनी ब्रायन लारा स्टेडियम, तौरोबा, त्रिनिदादा येथे टॉस करण्यात आला. अफगाणिस्तानच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कॅप्टन राशिद खान याने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता अफगाणि दक्षिण आफ्रिकेसमोर किती धावांचं आव्हान ठेवणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
अफगाणिस्तानची वर्ल्ड कप फायनलमध्ये खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर दक्षिण आफ्रिका याबाबतीत अनुभवी आहे. या महत्त्वाच्या सामन्यासाठी दोन्ही संघांनी मोठा निर्णय घेतला आहे. दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान कॅप्टन एडन मारक्रम आणि राशिद खान या दोघांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. दोन्ही कर्णधारानी आपल्या त्याच 11 खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे.
दरम्यान दक्षिण आफ्रिका टीम या स्पर्धेत अद्याप अजिंक्य आहे. दक्षिण आफ्रिकेने साखळी फेरीतील 4 आणि सुपर 8 मधील 3 असे एकूण आणि सलग 7 सामने जिंकले आहेत. तर दुसऱ्या बाजूला अफगाणिस्तान साखळी आणि सुपर 8 फेरीत प्रत्येकी 1-1 सामना गमावलाय. तर उर्वरित सर्व सामने जिंकले आहेत. अफगाणिस्तानने न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या दिग्गज संघांना पराभूत करत इथवर पोहचली आहे. आता अफगाणिस्तान इथे कशी कामगिरी करते, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
दरम्यान दक्षिण आफ्रिका वनडे आणि टी 20 या दोन्ही वर्ल्ड कप स्पर्धेत याआधी 7 वेळा सेमी फायनलपर्यंत पोहचली आहे. मात्र त्यांना एकदाही अंतिम फेरीत पोहचता आलेलं नाही. तर अफगाणिस्तानची पहिली वेळ आहे. आता फायनलमध्ये कोण पोहचणार? याकडे साऱ्यांचंच लक्ष लागून आहे.
अफगाणिस्तानच्या बाजूने नाणेफेकीचा कौल
🚨 We are Batting First! 🚨
The skipper @RashidKhan_19 won the toss and decided that #AfghanAtalan will bat first against South Africa. 👍#T20WorldCup | #AFGvSA | #GloriousNationVictoriousTeam pic.twitter.com/vCIQ9COqVH
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) June 27, 2024
दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन : एडन मारक्रम(कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जान्सेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्खिया आणि तबरेझ शम्सी.
अफगाणिस्तान प्लेइंग ईलेव्हन: राशीद खान (कर्णधार), रहमानउल्लाह गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, अजमतुल्ला उमरझाई, गुलबदिन नायब, मोहम्मद नबी, करीम जनात, नांगेलिया खरोटे, नूर अहमद, नवीन-उल-हक आणि फजलहक फारुकी.