SA vs AFG: दक्षिण आफ्रिका-अफगाणिस्तान सेमी फायनलसाठी सज्ज, कोण मारणार अंतिम फेरीत धडक?
South Africa vs Afghnistan Semi Final: अफगाणिस्तानला फायनलमध्ये पोहचण्याची संधी आहे. मात्र त्यासाठी अफगाणिस्तानला दक्षिण आफ्रिकेचा विजयरथ रोखण्याचं आव्हान असणार आहे.
आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 सेमी फायनलच्या पहिल्या सामन्याला अवघे काही तास शिल्लक आहे. या पहिल्या सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान अशी चुरशीची लढत होणार आहे. एडन मारक्रम दक्षिण आफ्रिकेचं आणि राशिद खान अफगाणिस्तानचं नेतृत्व करणार आहे. दोन्ही संघ याआधी एकदाही फायनलमध्ये पोहचलेले नाहीत. दक्षिण आफ्रिका अनेकदा सेमी फायनलपर्यंत पोहचलीय. तर अफगाणिस्तानची सेमी फायनलमध्ये पोहचण्याची ही यंदाची पहिलीच वेळ ठरली आहे. अशात विजयी होणाऱ्या संघाची फायनलमध्ये पोहचण्याची ही पहिलीच वेळ ठरणारल आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.
या सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 6 वाजता सुरुवात होणार आहे. तर 5 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. हा सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्स आणि डीडी स्पोर्ट्सवर पाहायला मिळेल. तर मोबाईलवर डिज्ने प्लस हॉटस्टार एपवर बघता येईल. दक्षिण आफ्रिका या स्पर्धेत अद्याप अजिंक्य आहे. दक्षिण आफ्रिकेने साखळी आणि सुपर 8 मधील सर्व सामने जिंकले आहेत. तर अफगाणिस्तानला साखळी आणि सुपर 8 मधील प्रत्येकी 1-1 साम्यात पराभूत व्हावं लागलं आहे. त्यामुळे अफगाणिस्तानसमोर दक्षिण आफ्रिकेचा विजयरथ रोखण्याचा आव्हान असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला दक्षिण आफ्रिकेसमोर अफगाणिस्तानच्या गोलंदाजीचा सामना करण्याचं आव्हान असणार आहे. अशात आता कोण बाजी मारतं, हे येत्या काही तासात स्पष्ट होईल.
दक्षिण आफ्रिका-अफगाणिस्तान आमनेसामने
𝐈𝐭’𝐬 𝐭𝐡𝐞 𝐒𝐞𝐦𝐢-𝐅𝐢𝐧𝐚𝐥 𝐓𝐢𝐦𝐞 𝐟𝐨𝐫 #𝐀𝐟𝐠𝐡𝐚𝐧𝐀𝐭𝐚𝐥𝐚𝐧! 🤩
🆚 @ProteasMenCSA 🇿🇦 🗓️ Tomorrow, June 27 🕔 05:00 AM (AFT) 🏟️ Brian Lara Stadium, Tarouba, Trinidad#T20WorldCup | #AFGvSA | #GloriousNationVictoriousTeam pic.twitter.com/5ZaF3Kdc1b
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) June 26, 2024
दक्षिण आफ्रिका टीम : एडन मार्करम (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, ॲनरिक नॉर्टजे, तबरेझ शम्सी, ओटनील बार्टमन, गेराल्ड कोएत्झी, ब्योर्न फॉर्च्युइन आणि रायन रिकेल्टन.
अफगाणिस्तान क्रिकेट टीम: राशीद खान (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, अजमतुल्ला उमरझई, गुलबदिन नायब, मोहम्मद नबी, करीम जनात, नांगेलिया खरोटे, नूर अहमद, नवीन-उल-हक, फझलहक फारुकी, नजीबुल्ला झदरन, फरीद अहमद मलिक, हजरतुल्ला झझई आणि मोहम्मद इशाक.