SA vs AFG: अफगाणिस्तानचं आव्हान संपुष्टात, पराभवानंतर कॅप्टन राशिदने काय म्हटलं?

Rashid Khan Post Match Presentation: राशिद खान याच्या नेतृत्वात अफगाणिस्तानचं टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम फेरीत पोहचण्याचं स्वप्न भंगलं. कॅप्टन राशिद खान या पराभवानंतर काय म्हणाला?

SA vs AFG: अफगाणिस्तानचं आव्हान संपुष्टात, पराभवानंतर कॅप्टन राशिदने काय म्हटलं?
rashid khan post match presentation
Follow us
| Updated on: Jun 27, 2024 | 9:08 AM

दक्षिण आफ्रिका टीमने इतिहास रचला आहे. दक्षिण आफ्रिका आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील अंतिम फेरीत धडक मारली आहे. दक्षिण आफ्रिकेला एकूण 7 वेळा सेमी फायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर वर्ल्ड कप स्पर्धेत आठव्या प्रयत्नात अंतिम फेरीत पोहचण्यात यश आलं. दक्षिण आफ्रिकेचा या नवव्या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतील हा सलग आठवा विजय ठरला. दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानकडून विजयासाठी मिळालेलं 57 धावांचं आव्हान हे 1 विकेट गमावून पूर्ण केलं. अफगाणिस्तानचं या पराभवासह आव्हान संपुष्टात आल. अफगाणिस्तानने या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली. अफगाणिस्तानने साखळी आणि सुपर 8 मध्ये न्यूझीलंड- ऑस्ट्रेलिया सारख्या संघांना पराभूत करत इथवर मजल मारली. मात्र अखेर सेमी फायनलमध्ये त्यांचा प्रवास संपला. या पराभवानंतर अफगाणिस्तानचा कॅप्टन राशिद खान याने काय म्हटलं जाणून घेऊयात.

राशिद खान काय म्हणाला?

“आमच्या टीमसाठी ही एक आव्हानात्मक रात्र होती. आम्ही कदाचित चांगली कामगिरी करु शकलो असतो, पण परिस्थितीने आम्हाला हवं ते करू दिलं नाही. T20 क्रिकेट हे असेच आहे, तुम्हाला सर्व परिस्थितींसाठी तयार असणं आवश्यक आहे. मला वाटतं की दक्षिण आफ्रिकेने खरोखरच चांगली बॉलिंग केली”, असं म्हणत राशिदने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचं कौतुक केलं.

राशिदने या पराभवानंतर आपल्या गोलंदाजांचीही पाठ थोपटली.”मला वाटतं की या स्पर्धेत आम्हाला चांगले यश मिळाले, कारण सीमर्सनी खरोखर चांगली बॉलिंग केली. मुजीबच्या दुखापतीमुळे आम्ही दुर्दैवी ठरलो. पण आमचे सीमर्स आणि अगदी मोहम्मद नबी यानेही नव्या बॉलस उल्लेखनीय बॉलिंग केली. त्यामुळे फिरकीपटूंनी काम सोपं केलं. आम्ही या स्पर्धेचा आनंद लुटला. आम्ही उपांत्य फेरीत खेळणं आणि आफ्रिकेसारख्या आघाडीच्या टीमकडून पराभूत झालो, हे स्वीकारतो”, असं राशिदने नमूद केलं.

“आमच्यासाठी ही फक्त सुरुवात आहे, आमच्याकडे कोणत्याही बाजूने मात करण्याचा आत्मविश्वास आणि विश्वास आहे. आमच्यासाठी हा एक उत्तम शिकण्याचा अनुभव आहे. आम्हाला माहितीय की आमच्याकडे कौशल्ये आहेत, ती फक्त कठीण परिस्थिती, दबाव परिस्थिती हाताळण्याबद्दल आहे”, असं राशिदने स्पष्ट केलं.

“आम्हाला काही सुधार करावे लागतील विशेष करुन मधल्या फळीतील बॅटिंगमध्ये. आमच्यासाठी हे नेहमीच शिकत असते आणि आम्ही आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. आम्ही अधिक कठोर मेहनत करून खास करुन बॅटिंगमध्ये कमबॅक करतो”, असं राशिदने म्हटलं.

दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन : एडन मारक्रम(कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जान्सेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्खिया आणि तबरेझ शम्सी.

अफगाणिस्तान प्लेइंग ईलेव्हन: राशीद खान (कर्णधार), रहमानउल्लाह गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, अजमतुल्ला उमरझाई, गुलबदिन नायब, मोहम्मद नबी, करीम जनात, नांगेलिया खरोटे, नूर अहमद, नवीन-उल-हक आणि फजलहक फारुकी.

Non Stop LIVE Update
राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, या जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट
राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, या जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट.
राज्यात ‘लाडकी बहीण योजना’ लागू, महिलांनी मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
राज्यात ‘लाडकी बहीण योजना’ लागू, महिलांनी मुख्यमंत्र्यांना बांधली राखी.
अमिरेकत राज ठाकरे यांचं मराठमोळ्या पद्धतीने स्वागत, व्हिडीओ व्हायरल
अमिरेकत राज ठाकरे यांचं मराठमोळ्या पद्धतीने स्वागत, व्हिडीओ व्हायरल.
सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन, मुख्यमंत्र्यांची नवीन योजना
सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन, मुख्यमंत्र्यांची नवीन योजना.
काल फडणवीस- ठाकरे तर आज हे दोन नेते आमनेसामने; काय झाली चर्चा?
काल फडणवीस- ठाकरे तर आज हे दोन नेते आमनेसामने; काय झाली चर्चा?.
'औरंगजेब-याकूब मेमनला फादर मानलं त्यांना चादरीशिवाय काय दिसणार?'
'औरंगजेब-याकूब मेमनला फादर मानलं त्यांना चादरीशिवाय काय दिसणार?'.
जब चादर लगी फटने तब खैरात लगी बंटने, कुणाकडून सरकारच्या बजेटची चिरफाड?
जब चादर लगी फटने तब खैरात लगी बंटने, कुणाकडून सरकारच्या बजेटची चिरफाड?.
'या' शहरात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार, काय केली अजितदादांनी घोषणा?
'या' शहरात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार, काय केली अजितदादांनी घोषणा?.
तुम्ही 21-60 वर्षाच्या आहात? मग दर महिन्याला 1500 रूपये घेऊन जा..
तुम्ही 21-60 वर्षाच्या आहात? मग दर महिन्याला 1500 रूपये घेऊन जा...
वर्षाला 3 गॅस सिलिंडर फ्री, दादांकडून नव्या योजनेची घोषणा, कुणाला लाभ?
वर्षाला 3 गॅस सिलिंडर फ्री, दादांकडून नव्या योजनेची घोषणा, कुणाला लाभ?.