Cricket | ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे-टी 20 सीरिजसाठी टीम जाहीर, तिलक वर्मा याच्या मित्राला संधी

आगामी वनडे आणि टी 20 सीरिजसाठी निवड समितीने टीम इंडियाचा युवा फलंदाज तिलक वर्मा याच्या मित्राला संधी दिली आहे.

Cricket | ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे-टी 20 सीरिजसाठी टीम जाहीर, तिलक वर्मा याच्या मित्राला संधी
Follow us
| Updated on: Aug 14, 2023 | 9:28 PM

मुंबई | बहुप्रतिक्षित आशिया कप 2023 स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. तर दुसऱ्या बाजूला 30 ऑगस्टपासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या या वनडे आणि टी 20 मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. टीममध्ये वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्खिया याची एन्ट्री झाली आहे. आयसीसी आणि साऊथ आफ्रिका क्रिकेटने ट्विट करत याबाबतची माहिती चाहत्यांना दिली आहे.

तडाखेबाज फलंदाज डेवाल्ड ब्रेविस याला पहिल्यांदाच वनडे आणि टी 20 टीममध्ये संधी देण्यात आली आहे. डेवाल्डने 2022 साली अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत सर्वांचं लक्ष वेधलं होतं. डेवाल्डने अनेक लीग स्पर्धेतही चमकदार कामगिरी केली होती. डेवाल्डने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स टीमकडून खेळताना शानदार खेळी केली होती. टीम इंडियाचा तिलक वर्मा आणि डेवाल्ड ब्रेव्हिस हे जिगरी मित्र आहेत. डेवाल्ड ब्रेव्हिस याला बेबी डीवीलियर्स असंही म्हटलं जातं

हे सुद्धा वाचा

अनेक खेळाडूंचं कमबॅक

दक्षिण आफ्रिका टीममध्ये अनेक खेळाडूंचं कमबॅक झालं आहे. दुखापतीनंतर केशव महाराज याची वनडे आणि टी 20 टीममध्ये कमबॅक झालंय. तसेच एनरिक नॉर्खिया याचाही सामवेश करण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे आणि टी 20 सीरिजसाठी ऑस्ट्रेलिया टीम

तसेच टी 20 सीरिजसाठी अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. कगिसो रबाडा, हेनरिक क्लासेन, एनरिक नॉर्खिया आणि क्विंटन डी कॉक या सर्वांना विश्रांती दिली आहे. विश्रांती देण्यात आलेले खेळाडे हे आगामी वनडे वर्ल्ड कपसाठी सराव करणार आहेत.

दक्षिण अफ्रीका वनडे टीम | टेम्बा बावुमा (कॅप्टन), डेवाल्ड ब्रेविस, गेराल्ड कोएत्जी, क्विंटन डी कॉक, ब्योर्न फोर्टुइन, रीजा हेंड्रिक्स, मार्को जानसन, हेनरिक क्लासेन, सिसंडा मगाला, केशव महाराज, एडेन मार्कराम, डेविड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्टजे , तबरेज शम्सी, वेन पार्नेल, कगिसो रबाडा, ट्रिस्टन स्टब्स आणि रस्सी वन डेर डूसन.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी 20 सीरिजसाठी दक्षिण अफ्रीका टीम | एडेन मार्कराम (कर्णधार), टेम्बा बावुमा, मैथ्यू ब्रीट्ज़के, डेवाल्ड ब्रेविस, गेराल्ड कोएत्जी, डोनोवन फरेरा, ब्योर्न फोर्टुइन, रीजा हेंड्रिक्स, मार्को जानसन, सिसंडा मगाला, केशव महाराज, लुंगी एनगिडी, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, लिजाद विलियम्स आणि रस्सी वन डेर डुसेन.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.