SA vs BAN Test : दुसऱ्या दिवसअखेर दक्षिण अफ्रिकेकडे 537 धावांची आघाडी, बांग्लादेश 4 बाद 38 धावा

दुसऱ्या कसोटी सामना बांग्लादेश आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात सुरू आहे. या सामन्यावर दक्षिण अफ्रिकेची मजबूत पकड पाहायला मिळत आहे. दुसऱ्या दिवसअखेर दक्षिण अफ्रिकेकडे 537 धावांची आघाडी असून बांगलादेशने 38 धावांवर 4 गडी गमावले आहेत.

SA vs BAN Test : दुसऱ्या दिवसअखेर दक्षिण अफ्रिकेकडे 537 धावांची आघाडी, बांग्लादेश 4 बाद 38 धावा
Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Oct 30, 2024 | 4:56 PM

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 साखळी फेरीतील महत्त्वाचा सामना दक्षिण अफ्रिका आणि बांग्लादेश यांच्यात सुरु आहे. पहिला सामना जिंकून दक्षिण अफ्रिकेने 1-0 ने आघाडी घेतली आहे. तर दुसऱ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी मजबूत स्थितीत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे दुसरा कसोटी सामना जिंकताच दक्षिण अफ्रिकेला मजबूत फायदा होणार आहे. दरम्यान, दुसऱ्या दिवशी दक्षिण अफ्रिकेने एकूण 144.2 षटकांचा सामना करत 6 गडी गमवून 575 धावा केल्या. तसेच डाव घोषित करत बांगलादेशला खेळण्याचं आव्हान दिलं. बांग्लादेशचा संघ पहिल्या डावातील धावांचा पाठलाग करताना डगमगला. आघाडीचे चार फलंदाज स्वस्तात बाद झाले. शदमान इस्लामला आपलं खातंही खोलता आलं नाही.

दक्षिण अफ्रिकेने पहिल्या दिवशी 2 बाद 307 धावा केल्या होत्या. तर टॉनी जॉर्झी आणि बेडिंघम दोघंही नाबाद होते. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा बेडिंघम 59 धावा करून बाद झाला. त्यानंतर टॉनी जॉर्झीने 150 धावा पूर्ण करत द्विशतकाकडे कूच केली. पण 177 धावांवर असताना तैजुल इस्लामच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्यानंतर रिकलटोन आणि काइल वेरेन काही खास करू शकले नाहीत. सेनुरान मुथुसामी आणि विआन मुल्डर सातव्या विकेटसाठी जबरदस्त भागीदारी केली. दोघांनी 125 धावांची भागीदारी केली. तर मुल्डरने 150 चेंडूत नाबाद 105 धावा, तर सेनुरान मुथुसामीने नाबाद 75 चेंडूत नाबाद 68 धावांची खेळी केली.

दक्षिण अफ्रिकेने पहिल्या डावात केलेल्या 575 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशची त्रेधातिरपीट उडाली. कागिसो रबाडाने दोन धक्के दिले. तर डेन पीटरसन आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. बांगलादेशची सध्याची स्थिती पाहता फॉलोऑन मिळेल असंच वाटत आहे. एकंदरीत, बांग्लादेश हा पराभवाच्या छायेखाली आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): महमुदुल हसन जॉय, शादमान इस्लाम, मोमिनुल हक, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मुशफिकुर रहीम, महिदुल इस्लाम अंकन (विकेटकीपर), झाकीर हसन, मेहदी हसन मिराझ, तैजुल इस्लाम, हसन महमूद, नाहिद राणा.

दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): एडन मार्कराम (कर्णधार), टोनी डी जोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, रायन रिकेल्टन, काइल वेरेन (विकेटकीपर), सेनुरान मुथुसामी, विआन मुल्डर, केशव महाराज, कागिसो रबाडा, डेन पॅटरसन.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.