Jasprit Bumrah याचा दक्षिण आफ्रिके विरुद्ध महारेकॉर्ड, नक्की काय केलं?
South Africa vs India 2nd Test | जसप्रीत बुमराह याने टीम इंडियाला आतापर्यंत आपल्या धारदार बॉलिंगच्या जोरावर अनेक सामने जिंकून दिले आहेत. बुमराहने दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात रेकॉर्ड ब्रेक कामिगरी केली आहे. जाणून घ्या बुमराहने काय केलंय?
केप टाऊन | रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडियाने दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 विकेट्सने धुव्वा उडवला. टीम इंडियाने या विजयासह दक्षिण आफ्रिका दौऱ्याचा शेवट आणि नवीन वर्षाची सुरुवात ही विजयाने केली. टीम इंडियाचे गोलंदाज हे खऱ्या अर्थाने विजयाचे शिल्पकार ठरले. मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह या दोघांनी दक्षिण आफ्रिकेच्या बॅटिंगला सुरुंग लावला. जसप्रीत बुमराह याने या सामन्यात मोठा कारनामा केला. यासह बुमराह केप टाऊनमधील न्यू लँड्स क्रिकेट स्टेडियममध्ये सर्वाधिक विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला.
जसप्रीत बुमराह याने दुसऱ्या कसोटीतील पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या पहिल्या डावात 2 विकेट्स घेतल्या. यासह बुमराहने अनिल कुंबळे याला मागे टाकलं. तसेच बुमराह जवागल श्रीनाथ यांच्यासह न्यूलँड्समध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा संयुक्तरित्या पहिला गोलंदाज ठरला. त्यामुळे बुमराहला जवागल श्रीनाथ याला मागे टाकण्यासाठी अवघ्या एका विकेटची गरज होती. बुमराहने ही विकेट दुसऱ्या दिवशी घेत हा महारेकॉर्ड आपल्या नावे केला. बुमराहने डेव्हिड बेडिंगहॅम याला शिकार करत हा विक्रम आपल्या नावावर केला.
दरम्यान टीम इंडियाने दुसरा सामना जिंकून 2 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. त्यामुळे मॅन ऑफ द सीरिजही वाटून देण्यात आली. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर आणि जसप्रीत बुमराह या दोघांना मॅन ऑफ द सीरिज देण्यात आली. बुमराह या मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. बुमराहने या 2 सामन्यांच्या मालिकेत एकूण 12 विकेट्स घेतल्या. तर डीन एल्गर याने या मालिकेत सर्वाधिक 201 धावा केल्या.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा आणि मुकेश कुमार.
दक्षिण आफ्रिका प्लेईंग इलेव्हन | डीन एल्गर (कॅप्टन), एडन मारक्रम, टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकटेकीपर), मार्को जान्सेन, केशव महाराज, कगिसो रबाडा, नांद्रे बर्गर आणि लुंगी एनगिडी.