SA vs IND 2nd Odi Live Streaming : दुसऱ्या वनडेमध्ये मोठा बदल, सामना कुठे पाहता येणार?
South Africa vs India 2nd Odi Live Streaming | टीम इंडियाच्या गोलंदाजांनी पहिल्याच एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पाणी पाजलं. त्यानंतर फलंदाजांनी मोहिम फत्ते केली. आता दुसऱ्या सामन्यात मोठा बदल करण्यात आला आहे. जाणून घ्या आत्ताच.
ग्वेबेऱ्हा | क्रिकेट टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडने अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 8 विकेट्सने विजय मिळवला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी आधी दक्षिण आफ्रिकेला अवघ्या 27.3 ओव्हरमध्ये 116 धावांवर गुंडाळलं. त्यानंतर टीम इंडियाने 117 धावांचं आव्हान हे अवघ्या 16.4 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून पूर्ण केलं. टीम इंडियाने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. आता उभयसंघातील दुसऱ्या आणि निर्णायक सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. या दुसऱ्या सामन्याच्या वेळेत बदल करण्यात आलेला आहे. हा सामना कधी होणार, कुठे पाहता येणार हे आपण जाणून घेऊयात.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया दुसरा सामना केव्हा?
दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया दुसरा सामना हा मंगळवारी 19 डिसेंबर रोजी होणार आहे.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया दुसरा सामना कुठे?
दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया दुसरा सामना हा ग्वेबेऱ्हा येथील सेंट जॉर्जस पार्क येथे आयोजित करण्यात आला आहे.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया दुसरा सामना किती वाजता सुरु होणार?
दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया दुसऱ्या एकदिवसीय सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील दुसरा सामना टीव्हीवर कुठे पाहता येणार?
दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील दुसरा सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील दुसरा सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळणार?
दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील दुसरा सामना मोबाईलवर डिज्नी प्लस हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.
एकदिवसीय मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका टीम | एडन मारक्रम (कॅप्टन), बार्टमॅन, नांद्रे बर्गर, टोनी डी जॉर्जी, रीजा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, मिहाली पोंगवाना, डेविड मिलर, वियान मुल्डर, एंडिले फेहलुकवायो, तबरेज शम्सी, रासी वेन डेर डुसे, कायल वेरेयेन आणि लिजाड विलियम्स.
दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया | केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार, आवेश खान , अर्शदीप सिंग आणि आकाश दीप.