SA vs IND 2nd Odi | रिंकू सिंह दुसऱ्या सामन्यातून वनडे डेब्यू करणार? आणखी एक शर्यतीत
South Africa vs India 2nd Odi | पहिल्या एकदिवसीय सामन्यातून टीम इंडियाकडून दक्षिण आफ्रिके विरुद्ध साई सुदर्शन याने पदार्पण केलं होतं. त्यानंतर आता दुसऱ्या सामन्यातून कुणाला पदार्पणाची संधी मिळणार? रिंकूसह या खेळाडूंचं नाव चर्चेत. कोण आहे तो?
ग्वेबेऱ्हा | दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया यांच्यात मंगळवारी 19 नोव्हेंबरला दुसरा एकदिवसीय सामना होणार आहे. हा सामना सेंट जॉर्जस पार्क ग्वेबेऱ्हा येथे होणार आहे. सामन्याला दुपारी साडे चार वाजता सुरुवात होणार आहे. तर 4 वाजता टॉस होणार आहे. केएल राहुल याच्याकडे टीम इंडियाचं नेतृत्व आहे. तर एडन मारक्रम दक्षिण आफ्रिकेची सूत्र सांभाळणार आहे. टीम इंडिया 1-0 ने आघाडीवर असल्याने मालिका विजयाची संधी आहे. तर दक्षिण आफ्रिकेसाठी करा किंवा मरा असा सामना आहे. या दुसऱ्या सामन्यातून पदार्पणाची संधी मिळेल, अशा आशा टीम इंडियातल्या दोन खेळाडूंना आहे.
ते दोघे कोण?
पहिलं नाव तर सर्वांनाच माहिती आहे, ते म्हणजे रिंकू सिंह. तर दुसरा खेळाडू आहे तो म्हणजे रजत पाटीदार. आता रिंकू सिंह आणि रजत पाटीदार या दोघांपैकी कुणा एकाला दक्षिण आफ्रिके विरुद्ध पदार्पणाची संधी द्यायची, हा मोठा प्रश्न कॅप्टन केएल राहुल आणि टीम मॅनजमेंटसमोर असणार आहे. टीम इंडिया वनडेनंतर दक्षिण आफ्रिके विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. श्रेयस अय्यर कसोटी मालिकेच्या तयारीला लागला आहे.त्यामुळे मधल्या फळीत एका जागा रिकामी आहे.
त्यामुळे आता श्रेयसच्या जागी रिंकूला खेळवायचं की रजतला संधी द्याची, असा पेच निर्माण झाला आहे. रिंकू सिंह याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी 20 मालिकेतून झंझावाती फलंदाजी केली. तसेच दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या टी 20 सीरिजमध्येही आपली छाप सोडली. त्यामुळे रिंकून स्वत:ला सिद्ध केलयं. तर दुसऱ्या बाजूला रजत पाटीदार याची 2022 मध्येही टीम इंडियात निवड करण्यात आली होती. मात्र तेव्हा त्याला संधी मिळाली नाही. त्यामुळे आता रिंकूला संधी मिळणार की रजतची प्रतिक्षा संपणार, हे काही तासात स्पष्ट होईल.
एकदिवसीय मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका टीम | एडन मारक्रम (कॅप्टन), बार्टमॅन, नांद्रे बर्गर, टोनी डी जॉर्जी, रीजा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, मिहाली पोंगवाना, डेविड मिलर, वियान मुल्डर, एंडिले फेहलुकवायो, तबरेज शम्सी, रासी वेन डेर डुसे, कायल वेरेयेन आणि लिजाड विलियम्स.
दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया | केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार, आवेश खान , अर्शदीप सिंग आणि आकाश दीप.