SA vs IND 2nd Odi | नक्की कुठे चुकलं? कॅप्टन केएल पराभवानंतर म्हणाला…

SA vs IND 2nd Odi Highlights | टीम इंडियाने केएल राहुल याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेची सुरुवात झोकात केली. मात्र दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाला त्याच पद्धतीने पराभूत व्हावं लागलं.

SA vs IND 2nd Odi | नक्की कुठे चुकलं? कॅप्टन केएल पराभवानंतर  म्हणाला...
Follow us
| Updated on: Dec 20, 2023 | 12:24 AM

ग्वेबेऱ्हा | क्रिकेट टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पराभव झाला आहे. टीम इंडियाने पहिला सामना 8 विकेट्सने जिंकून दणक्यात सुरुवात केली. मात्र दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने मुसंडी मारत जोरदार कमबॅक केलं. दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियावर 8 विकेट्सने विजय मिळवत हिशोब बरोबर केला. दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. टीम इंडियाला 211 धावांवर ऑलआऊट केल्याने विजयासाठी 212 धावांच आव्हान मिळालं. हे आव्हान टोनो डी जॉर्जी याच्या नाबाद शतकाच्या जोरावर 43 व्या ओव्हरमध्यू पूर्ण केलं.

त्याआधी टीम इंडियाकडून सलामीवीर साई सुदर्शन आणि कॅप्टन केएल राहुल याने अर्धशतकी खेळी केली. सुदर्शनने 83 बॉलमध्ये 7 चौकार आणि 1 सिक्सच्या मदतीने 62 धावा केल्या. तर केएलने 64 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने 56 धावा केल्या. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी सर्वाधिक 68 धावांची भागीदारी केली. दक्षिण आफ्रिकेच्या नांद्रे बर्गर याने 3 विकेट्स घेतल्या. तर ब्यूरेन हेंड्रिक्स आणि केशव महाराज या दोघांना 2-2 विकेट्स मिळाल्या. टीम इंडियाचे फलंदाज आणि गोलंदाज या सामन्यात अपयशी ठरले. टीम इंडियाला हा सामना जिंकून मालिका विजयाची संधी होती. ती संधी टीम इंडियाने गमावली. टीम इंडियाच्या पराभवानंतर केएल काय म्हणाला, हे जाणून घेऊयात.

केएल काय म्हणाला?

“सुरुवातीला थोडी मदत झाली. बॅटिंग करणं आव्हानात्मक होतं. पण आम्ही दोघे (केएल आणि साई सुदर्शन) सेट झालो. आम्ही पुढे गेलो असतो, तर 50-60 धावा आणखी जास्त झाल्या असत्या. त्यामुळे फरक पडला असता. आम्ही निर्णायक क्षणी विकेट गमावल्या”, असं केएल पराभवानंतर म्हणाला.

हे सुद्धा वाचा

“पहिल्या दहा ओव्हरमध्ये आम्हाला मदत मिळाली. आम्ही चांगलं खेळलो. मात्र ते सातत्य (पहिल्या डावात) आम्हाला कायम ठेवता आलं नाही. सातत्य राहिलं असतं तर कदाचित परिस्थिती वेगळी असती.”, अशी खंत केएलने व्यक्त केली.”

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | केएल राहुल(कॅप्टन आणि विकेटकीपर), रुतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, संजू सॅमसन, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आवेश खान, कुलदीप यादव, मुकेश कुमार

दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | एडन मारक्रम (कॅप्टन), टोनी डी झोर्झी, रीझा हेंड्रिक्स, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, केशव महाराज, नांद्रे बर्गर, लिझाद विल्यम्स आणि ब्यूरन हेंड्रिक्स.

मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.