SA vs IND 2nd ODI | टीम इंडियाला मालिका विजयाची संधी, दक्षिण आफ्रिकेला ‘करो या मरो’

South Africa vs India 2nd Odi | केएल राहुल याने आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला दक्षिण आफ्रिके विरुद्ध धमाकेदार विजय मिळवून दिला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी केली. त्यानंतर दुसऱ्या सामन्यातही अशाच कामगिरीची अपेक्षा भारतीय खेळाडूंकडून असणार आहे.

SA vs IND 2nd ODI | टीम इंडियाला मालिका विजयाची संधी, दक्षिण आफ्रिकेला 'करो या मरो'
Follow us
| Updated on: Dec 18, 2023 | 8:54 PM

ग्वेबेऱ्हा | टीम इंडियाने केएल राहुल याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत विजयी सलामी दिली. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर 8 विकेट्सने विजय मिळवत धमाकेदार सुरुवात केली. टीम इंडियाने विजयासाठी मिळालेलं 117 धावांचं आव्हान 2 विकेट्सच्या मोबदल्यात 16.4 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. त्याआधी टीम इंडियाच्या अर्शदीप सिंह याने 5 आणि आवेश खान याने 4 विकेट्स घेत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीला सुरंग लावला. तर कुलदीप यादव याने 1 विकेट घेत या दोघांना चांगली साथ दिली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा डाव हा 27.3 ओव्हमध्ये 116 धावांवर आटोपला.

टीम इंडियाकडून 117 धावांचा पाठलाग करताना पदार्पणवीर साई सुदर्शन याने नाबाद सर्वाधिक 55 धावांचा खेळी केली. श्रेयस अय्यर याने धावा केल्या. तर ऋतुराज गायकवाड 5 धावा करुन आऊट झाला. तर तिलक वर्मा 1 धावा करुन नाबाद राहिला. टीम इंडियाने विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आता मालिकेतील दुसरा सामना हा 19 डिसेंबर रोजी होणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे.

टीम इंडियाला मालिका विजयाची संधी

टीम इंडियाने पहिला सामना जिंकल्याने दुसरा सामना जिंकून मालिका विजयाची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला दक्षिण आफ्रिकेवर मालिका पराभवाची टांगती तलवार आहे. दक्षिण आफ्रिकेला मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी दुसरा सामना कोणत्याही स्थितीत जिंकावा लागणार आहे. त्यामुळे आता दुसऱ्या सामन्यात टीम इंडिया सामन्यात विजय मिळवून मालिका जिंकते, की दक्षिण आफ्रिका आव्हान कायम राखण्यात यशस्वी ठरते याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

एकदिवसीय मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका टीम | एडन मारक्रम (कॅप्टन), बार्टमॅन, नांद्रे बर्गर, टोनी डी जॉर्जी, रीजा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, मिहाली पोंगवाना, डेविड मिलर, वियान मुल्डर, एंडिले फेहलुकवायो, तबरेज शम्सी, रासी वेन डेर डुसे, कायल वेरेयेन आणि लिजाड विलियम्स.

दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया | केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार, आवेश खान , अर्शदीप सिंग आणि आकाश दीप.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.