SA vs IND | साई आणि केएलने लाज राखली, दक्षिण आफ्रिकेसमोर 212 धावांचं आव्हान

South Africa vs India 2nd Odi 1st Innings Highlights | साई सुदर्शन आणि कॅप्टन केएल राहुल या दोघांचा अपवाद वगळता टीम इंडियाच्या एकाही फलंदाजाला मैदानात टिकता आलं नाही.

SA vs IND | साई आणि केएलने लाज राखली, दक्षिण आफ्रिकेसमोर 212 धावांचं आव्हान
Follow us
| Updated on: Dec 19, 2023 | 8:35 PM

ग्वेबेऱ्हा | दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या धारदार बॉलिंगसमोर लोटांगण घातलं आहे. टीम इंडियाच्या फलंदाजांना धड 50 ओव्हरही खेळता आलं नाही. दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचं 46.2 ओव्हरमध्ये 211 धावांवर पॅकअप केलं. त्यामुळे आता दक्षिण आफ्रिकेला मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी 212 धावांचं आव्हान मिळालं आहे.आता दक्षिण आफ्रिका सामना जिंकून मालिकेतील विजयाचं खातं उघडते की टीम इंडिया सीरिज जिंकते, याकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

टीम इंडियाची निराशाजनक सुरुवात

दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला टॉस जिंकून बॅटिंगला भाग पाडलं. ऋतुराज गायकवाड आणि साई सुदर्शन सलामी जोडी मैदानात आली. मात्र ऋतुराज 4 धावा करुन स्वसतात माघारी परतला. त्यानंतर साई आणि तिलक वर्मा या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी केली. ही जोडी सेट झालीय असं वाटताच तिलक वर्मा 10 धावा करुन आऊट झाला.

त्यानंतर कॅप्टन केएल राहुल आणि साई सुदर्शन या दोघांनी टीम इंडियाचा डाव सावरला. या दोघांनी या सामन्यातील मोठी तसेच तिसऱ्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी केली. या दरम्यान साईने सलग दुसरं अर्धशतक पूर्ण केलं. मात्र साई 62 धावा करुन आऊट झाला. साईनंतर केएलनेही अर्धशतक केलं. मात्र केएललाही साईप्रमाणे अर्धशतकानंतर मोठी खेळी करता आली नाही. साईनंतर संजू आऊट झाला. संजूनंतर केएलने मैदानाबाहेरचा रस्ता धरला. संजूने 12 आणि केएलने 56 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला ठराविक अंतराने झटके दिले.

रिंकू सिंग 17, अक्षर पटेल 7 आणि कुलदीप यादव 1 रनवर आऊट झाला. मात्र त्यानंतर अर्शदीप सिंह आणि आवेश खान यांनी फटकेबाजी केली. अर्शदीपने 18 आणि आवेशने 9 धावा केल्या. त्यामुळे टीम इंडियाचा स्कोअर 200 पार गेला. तर मुकेश कुमार 4 धावांवर नाबाद परतला. दक्षिण आफ्रिकेकडून नांद्रे बर्गर याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. ब्यूरन हेंड्रिक्स आणि केशव महाराज या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर लिझाद विल्यम्स आणि कॅप्टन एडन मारक्रम याने 1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | केएल राहुल(कॅप्टन आणि विकेटकीपर), रुतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, संजू सॅमसन, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आवेश खान, कुलदीप यादव, मुकेश कुमार

दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | एडन मारक्रम (कॅप्टन), टोनी डी झोर्झी, रीझा हेंड्रिक्स, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, केशव महाराज, नांद्रे बर्गर, लिझाद विल्यम्स आणि ब्यूरन हेंड्रिक्स.

सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.