IND vs SA : जिंकलेला सामना गमावला, कॅप्टन सूर्याची एक चूक पराभवास कारणीभूत!
South Africa vs India 2nd T20i : कर्णधाराचा एक एक निर्णय सामन्याच्या निकालाच्या हिशोबाने किती महत्त्वाचा ठरतो? हे क्रिकेट चाहत्यांना रविवारी दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यातील दुसऱ्या टी 20i सामन्यातून समजलं असेल.
टीम इंडियाला दुसर्या टी 20i सामन्यात पराभूत व्हावं लागलं. दक्षिण आफ्रिकेने रविवारी 10 नोव्हेंबरला झालेल्या या सामन्यात टीम इंडियाचा 3 विकेट्सने पराभव केला. भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याची एक चूक ही या पराभवास कारणीभूत ठरली. सूर्याने बॉलिंगमध्ये बदल केल्याने गडबड झाली. त्यामुळे जिंकलेला सामना अखेरच्या क्षणी फिरला आणि दक्षिण आफ्रिकने बाजी मारली. टीम इंडियाने 124 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेची प्रत्युत्तरात 7 बाद 86 अशी स्थिती झाली. मात्र त्यानंतर ट्रिस्टन स्टब्स आणि जेराल्ड कोएत्झी या दोघांनी चिवट खेळी करत दक्षिण आफ्रिकेला विजयी केलं.
खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी अनूकुल असल्याने मदत मिळत होती. वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई आणि अक्षर पटेल हे 3 स्पिनर प्लेइंग ईलेव्हनमध्ये होते. भारतासाठी या तिघांनी चिवट बॉलिंग केली. वरुणने 17 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स घेतल्या. रवी बिश्नोई याने 1 विकेट घेतली. या दोघांनी 8 ओव्हरमध्ये फक्त 38 धावा दिल्या. तर अक्षर पटेल याला विकेट मिळाली नाही. मात्र त्याने अचूक बॉलिंग करत दक्षिण आफ्रिकेवर दबाव तयार केला. अक्षरने 1 ओव्हरमध्ये फक्त 2 रन्स दिल्या. कॅप्टन सूर्याने अक्षरला त्याच्या कोट्यातील सर्व ओव्हर पूर्ण करुन दिल्या असत्या तर त्याचा फायदा झाला असता. मात्र तसं झालं नाही.
भारताच्या या फिरकी त्रिकुटाने दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना बांधून ठेवलेलं. मात्र निर्णायक क्षणी सूर्याने हार्दिक पंड्या, अर्शदीप सिंह आणि आवेश खान या फिरकी गोलंदाजांना बॉलिंगसाठी आणलं. ट्रिस्टन स्टब्स आणि कोएत्झी या दोघांना याचा पूर्ण फायदा घेतला. या दोघांनी फटकेबाजी करता सामना 19 व्या ओव्हरमध्येच संपवला. टीम इंडियाच्या तिन्ही वेगवान गोलंदाजांनी एकूण 10 षटकांमध्ये 86 धावा लुटवल्या. तर फिरकी गोलंदाजांनी 9 षटकांमध्ये 40 धावा देत 6 विकेट्स मिळवल्या.
दरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या फिरकी गोलंदाजांनीही आपली छाप सोडली. दक्षिण आफ्रिकेकडून 9 ओव्हर फिरकी गोलंदाजांनी केल्या. त्यांनी या 9 षटकांमध्ये 48 धावा देत 2 विकेट्स घेतल्या.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन : एडन मार्करम (कर्णधार), रायन रिकेल्टन, रीझा हेंड्रिक्स, ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, अँडीले सिमेलेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज आणि न्काबायोमझी पीटर
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती आणि आवेश खान.