SA vs IND 2nd T20I Toss: टीम इंडियाला दुसऱ्या सामन्यातही बॅटिंगचं आमंत्रण, प्लेइंग ईलेव्हनध्ये कोण?
South Africa vs India 2nd T20I Toss : दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या सामन्यातही टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना पहिल्या डावात टीम इंडियाची बॅटिंग पाहायला मिळणार आहे.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील दुसरा टी 20i सामना हा सेंट जॉर्ज पार्क, गकेबरहा येथे आयोजित करण्यात आला आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. दुसर्या सामन्यातही दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. कॅप्टन एडन मार्करम याने टीम इंडियाला बॅटिंगसाठी बोलावलं आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंनी पहिल्या सामन्यात विस्फोटक फलंदाजी करत 200 पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. त्यामुळे आता दुसऱ्या सामन्यातही अशाच मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे.
संजू सॅमसन याने डर्बनमध्ये झालेल्या सलामीच्या सामन्यात शतक ठोकलं होतं. तर तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव या दोघांनीही तडाखेबंद खेळी केली होती. त्यामुळे टीम इंडियाला 202 धावांपर्यंत मजल मारता आली. दक्षिण आफ्रिकेने त्या सामन्यातही टॉस जिंकून बॅटिंगला बोलावलेलं. आता दुसऱ्या सामन्यातही भारताला फलंदाजीचं आमंत्रण मिळालंय. त्यामुळे टीम इंडियाची युवा ब्रिगेड पुन्हा 200 पेक्षा अधिक धावा करणार का? याकडे लक्ष असणार आहे.
दरम्यान कॅप्टन सूर्यकुमार यादव याने दुसऱ्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तर दुसऱ्या बाजूला दक्षिण आफ्रिकेने एकमेव बदल केलाय. पहिल्या सामन्यात एका ओव्हरमध्ये 11 बॉल टाकणाऱ्या पॅट्रिक क्रूगर याला बाहेर करण्यात आलंय. तर त्याच्या जागी रीझा हेंड्रीक्स याचा समावेश करण्यात आला आहे.
टीम इंडिया किती धावा करणार?
🚨 Toss Update 🚨
South Africa win the toss and elect to field in the 2nd T20I.
Live – https://t.co/ojROEpNVp6#TeamIndia | #SAvIND pic.twitter.com/7jD9qakDLg
— BCCI (@BCCI) November 10, 2024
दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन : एडन मार्करम (कर्णधार), रायन रिकेल्टन, रीझा हेंड्रिक्स, ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, अँडीले सिमेलेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज आणि न्काबायोमझी पीटर
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती आणि आवेश खान.