Abhishek Sharma पुन्हा फ्लॉप, सलग तिसऱ्या डावात दुहेरी आकडा गाठण्यात अपयशी

SA vs IND 2nd T20i : टीम इंडियाचा फलंदाज अभिषेक शर्मा याने दुसऱ्या टी 20i सामन्यातही निराशा केली आहे. अभिषेक 4 धावा करुन माघारी परतला.

Abhishek Sharma पुन्हा फ्लॉप, सलग तिसऱ्या डावात दुहेरी आकडा गाठण्यात अपयशी
abhishek sharma sa vs ind 2nd t20i
Follow us
| Updated on: Nov 10, 2024 | 8:26 PM

टीम इंडियाचा युवा आणि स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा याने झिंबाब्वे दौऱ्यातील टी 20i मालिकेतून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. अभिषेकला पदार्पणात स्वप्नवत सुरुवात करता आली नाही. अभिषेक पहिल्याच सामन्यात झिरोवर आऊट झाला. मात्र अभिषेकने दुसऱ्या सामन्यात भरपाई करत शतक ठोकलं आणि आपली छाप सोडली. मात्र त्यानंतर अभिषेकला सातत्याने धावांसाठी संघर्ष करावा लागत आहे. अभिषेक दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी 20i सामन्यात अवघ्या 4 धावा करुन माघारी परतला आहे. यासह अभिषेक 7 डावांमध्ये मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला आहे.

अभिषेकने झिंबाब्वेविरुद्ध शतक करत साऱ्यांचं लक्ष वेधलं होतं. मात्र अभिषेकला त्यानंतरच्या सलग 8 सामन्यांमध्ये 20 पार मजल मारता आलेली नाही. तसेच अभिषेकला गेल्या 3 टी 20i सामन्यांमध्ये दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही. अभिषेक सातत्याने अपयशी ठरत असल्याने टीम इंडियाला अपेक्षित सुरुवात मिळत नाहीय. तसेच धावांचा दुष्काळ हा अभिषेकसाठीही चिंतेची बाब आहे. सोबतच आता टीम मॅनेजमेंटने वांरवार विश्वास दाखवून त्याला संधी दिली. मात्र अभिषेकला विश्वास सार्थ ठरवता आलेला नाही. त्यामुळे कॅप्टन सूर्यकुमार यादव अभिषेकला तिसऱ्या सामन्यातून डच्चू देणार का? याकडे साऱ्याचं लक्ष असणार आहे.

संजू आणि सूर्या फ्लॉप

दरम्यान पहिल्या विजयाचा शिल्पकार ठरलेला संजू सॅमसन दुसर्‍या सामन्यात अपयशी ठरला आहे. संजू सॅमसन भोपळाही फोडू शकला नाही. तर कॅप्टन सूर्यकुमार यादव याने 9 चेंडूत4 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. त्यामुळे भारताची 4 ओव्हरनंतर 15 रन्सवर 3 विकेट्स अशी स्थिती झाली. त्यामुळे आता मधल्या फळीतील फलंदाजांवर भारतीय संघाची संपूर्ण मदार असणार आहे.

अभिषेक शर्माचा धावांसाठी संघर्ष

दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन : एडन मार्कराम (कर्णधार), रायन रिकेल्टन, रीझा हेंड्रिक्स, ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, अँडीले सिमेलेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज आणि न्काबायोमझी पीटर

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती आणि आवेश खान.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.