SA vs IND 2nd Test Day 1 | पहिल्याच दिवशी 23 विकेट्स, दक्षिण आफ्रिका 36 धावांनी पिछाडीवर
South Africa vs India 2nd Test Day 1 Stumps | दुसऱ्या कसोटीतील पहिल्या दिवसाचा खऱ्या अर्थाने 'खेळ'झालाय. एकूण 23 विकेट्स गेल्या कसोटी सामना दुसऱ्या दिवशीच आटोपतो की काय, अशी चर्चा आता क्रिकेट चाहत्यांमध्ये रंगली आहे. पहिल्या दिवशी काय काय झालं? जाणून घ्या.
केप टाऊन | दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिला दिवसाचा खेळ संपला आहे. पहिल्या दिवशी एकूण 23 विकेट्स पडल्या. तसेच दक्षिण आफ्रिका 36 धावांची पिछाडीवर आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 55 धावांवर ऑलआऊट केलं. त्यानंतर टीम इंडियाने ऑलआऊट 153 धावा करत 98 धावांची आघाडी घेतली. तर दुसऱ्या डावात पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दक्षिण आफ्रिकेने 17 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 62 धावा केल्या आहेत.
दक्षिण आफ्रिकेकडून एडन मारक्रम 36 आणि डेव्हिड बेडिंगहॅम 7 धावा करुन नाबाद परतले. तर कॅप्टन डीन एल्गर याने आपल्या अखेरच्या डावात 12 धावा केल्या. तर टोनी डी झोर्झी आणि ट्रिस्टन स्टब्स हे दोघे 1-1 धाव करुन माघारी परतले. टीम इंडियाकडून मुकेश कुमार याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर जसप्रीत बुमराह याला 1 विकेट मिळाली.
त्याआधी दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला पहिल्या डावात 153 धावांवर गुंडाळलं. दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाच्या शेवटच्या 6 विकेट्स एकही धाव न देता मिळवल्या. टीम इंडियाकडून विराट कोहली याने सर्वाधिक 46 धावा केल्या. तर दक्षिण आफ्रिकेकडून तर कगिसो रबाडा आणि लुंगी एन्गिडी या दोघांनी 3-3 विकेटे्स घेतल्या.
पहिल्या दिवसाचा गेम ओव्हर
An action-packed Day 1 in Cape Town comes to an end 🙌🏻
A total of 2️⃣3️⃣ wickets were claimed on the opening day!
South Africa 62/3 in the second innings, trail by 36 runs.
Scorecard ▶️ https://t.co/PVJRWPfGBE#TeamIndia | #SAvIND pic.twitter.com/7lo71BWms0
— BCCI (@BCCI) January 3, 2024
त्याआधी टीम इंडियाने पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात 55 धावांवर गुंडाळलं. दक्षिण आफ्रिकेकडून फक्त दोघांनाच दुहेरी आकडा गाठता आला. तर टीम इंडियाकडून मोहम्मद सिराज याने 6 विकेट्स घेतल्या. तसेच मुकेश कुमार आणि जसप्रीत बुमराह या दोघांना 2-2 विकेट्स मिळाल्या.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा आणि मुकेश कुमार
दक्षिण आफ्रिका प्लेईंग इलेव्हन | डीन एल्गर (कॅप्टन), एडन मारक्रम, टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकटेकीपर), मार्को जान्सेन, केशव महाराज, कगिसो रबाडा, नांद्रे बर्गर आणि लुंगी एनगिडी.