केपटाऊन | दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला 153 धावांवर ऑलआऊट केलंय. लुंगी एन्गिडी आणि कगिसो रबाडा या दक्षिण आफ्रिकेच्या जोडीने टीम इंडियाचा अर्धा डाव अवघ्या 30 मिनिटांच्या आत उलटवला. केएल राहुल आऊट झाला तेव्हा टीम इंडियाची स्थिती 33.1 ओव्हरमध्ये 5 बाद 153 अशी होती. मात्र त्यानंतर टीम इंडिया 34.5 ओव्हरमध्येच झटपट 5 विकेट्स गमावल्या. त्याआधी टीम इंडियाने मोहम्मद सिराज याने घेतलेल्या 6 विकेट्सच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेला 55 धावांवर ऑलआऊट केलं होतं. त्यामुळे टीम इंडियाला आता 98 धावांची निर्णायक आघाडी मिळाली आहे.
टीम इंडियाकडून पहिल्या डावात फक्त तिघांनाच दुहेरी आकडा गाठता आला. एकट्याने 8 धावा केल्या. तर 6 जणांना भोपळाही फोडता आला नाही. तर मुकेश कुमारही झिरोवर नॉट आऊट राहिला. टीम इंडियाकडून विराट कोहली याने सर्वाधिक 46 धावांची खेळी केली. कॅप्टन रोहित शर्मा याने 39 धावा केल्या. तर शुबमन गिल याने 36 धावांचं योगदान दिलं. तर यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा ही मंडळी मैदानात आली तशीच परत गेली. या 6 जणांना खातंही उघडता आलं नाही.
6 विकेट शून्य धावा
153 for 4.
153 for 5.
153 for 6.
153 for 7.
153 for 8.
153 for 9.
153 for 10.India lost 6 wickets for without scoring a single run. pic.twitter.com/SfdAR78ced
— Johns. (@CricCrazyJohns) January 3, 2024
दक्षिण आफ्रिकेकडून कगिसो रबाडा, लुंगी एन्गिडी आणि नांद्रे बर्गर या तिघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेत टीम इंडियाला ऑलआऊट करण्यात मोठी भूमिका बजावली.
दरम्यान त्याआधी टीम इंडियाच्या धारदार बॉलिंगसमोर दक्षिण आफ्रिकेने लोटांगण घातलं. दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव हा अवघ्या 55 धावांवर आटोपला. मोहम्मद सिराज याने 6 विकेट्स घेतल्या. तर मुकेश कुमार आणि जसप्रीत बुमराह या दोघांना 2-2 विकेट्स मिळाल्या.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा आणि मुकेश कुमार
दक्षिण आफ्रिका प्लेईंग इलेव्हन | डीन एल्गर (कॅप्टन), एडन मारक्रम, टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकटेकीपर), मार्को जान्सेन, केशव महाराज, कगिसो रबाडा, नांद्रे बर्गर आणि लुंगी एनगिडी.