SA vs IND 2nd Test | मोहम्मद सिराजनंतर जसप्रीत बुमराहच्या 5 विकेट्स, टीम इंडिया मजबूत स्थितीत
South Africa vs India 2nd Test | टीम इंडियाच्या गोलंदाजांनी दुसऱ्या दिवशी जोरात सुरुवात करत दक्षिण आफ्रिकेला मागे ढकललंय. यात यॉर्कर किंग जसप्रीत बुमराहने दक्षिण आफ्रिकेला जोरदार पंच दिलाय.
केप टाऊन | दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना न्यूलँड्स केपटाऊन येथे खेळवण्यात येत आहे. या सामन्यातील आज (4 जानेवारी) दुसरा दिवस आहे. टीम इंडियाने दुसऱ्या दिवशी सामन्यावर घट्ट पकड मिळवली आहे. त्यामुळे टीम इंडियाचा विजय दृष्टीक्षेपात आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. टीम इंडियाच्या गोलंगदाजांनी दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेला ठराविक अंतराने झटके देत बॅकफुटवर ढकललंय. जसप्रीत बुमराह याने टीम इंडियाला दुसऱ्या दिवशी अप्रतिम सुरुवात करुन देत 5 विकेट्स पूर्ण केल्या आहेत.
दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात 98 धावांचा पाठलाग करताना 17 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 62 धावा केल्या. त्यामुळे दक्षिण आफ्रिका 36 धावांनी पिछाडीवर होती. त्यानंतर एडन मारक्रम 36 आणि डेव्हिड बेडिंगहॅम या जोडीने 62 धावांपासून दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. मात्र बुमराहने आपल्या काटा बॉलिंगने दक्षिण आफ्रिकेला झटके देत 5 विकेट्स घेतल्या.
पहिल्या दिवशी दुसऱ्या डावात ट्रिस्टन स्ट्रब्स याला आऊट केल्याने बुमराहच्या खात्यात 1 विकेट होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बुमराहने झटपट 4 विकेट्स घेत 5 विकेट्स घेतल्या. बुमराहने केशव महाराज याला आऊट करत विकेट्सचा पंच पूर्ण केला. बुमराहने ट्रिस्टन स्ट्रब्स आणि केशव महाराज यांच्या व्यतिरिक्त अनुक्रमे डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन आणि मार्को जान्सेन या तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
बुमराहची अशाप्रकारे कसोटीत 5 विकेट्स घेण्याची नववी आणि न्यूलँड्समधील दुसरी वेळ ठरली आबे. बुमराहची कसोटीत 27 धावांच्या मोबदल्यात 6 विकेट्स ही सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे.
सिराजनंतर बुमराहचा दक्षिण आफ्रिकेला पंच
That’s a brilliant FIVE-WICKET HAUL for @Jaspritbumrah93 🔥🔥
His second at Newlands Cricket Ground and 9th overall.#SAvIND pic.twitter.com/Y6H4WKufoq
— BCCI (@BCCI) January 4, 2024
दरम्यान त्याआधी पहिल्या डावात मोहम्मद सिराज याने 6 विकेट घेत दक्षिण आफ्रिकेला 55 धावांवर ऑलआऊट करण्यात निर्णायक भूमिका बजावली. त्यानंतर टीम इंडियाने 153 धावा करत 98 धावांची निर्णायक आघाडी घेतली. त्यामुळे आता टीम इंडियाला दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेला किती धावांवर रोखण्यात यश येतं, याकडे भारतीय चाहत्यांचं लक्ष असेल.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा आणि मुकेश कुमार
दक्षिण आफ्रिका प्लेईंग इलेव्हन | डीन एल्गर (कॅप्टन), एडन मारक्रम, टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकटेकीपर), मार्को जान्सेन, केशव महाराज, कगिसो रबाडा, नांद्रे बर्गर आणि लुंगी एनगिडी.