SA vs IND 2nd Test | जसप्रीत बुमराहसमोर दक्षिण आफ्रिका 176 वर ढेर, टीम इंडियाला विजयासाठी 79 धावांची गरज

South Africa vs India 2nd Test Day 2 | टीम इंडियाला 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 ने बरोबरी करण्यासाठी अवघ्या 79 धावांची गरज आहे. आता टीम इंडियाचे फलंदाज या 79 धावांचं आव्हान लंच ब्रेकनंतर कशाप्रकारे पूर्ण करतात, याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.

SA vs IND 2nd Test | जसप्रीत बुमराहसमोर दक्षिण आफ्रिका 176 वर ढेर, टीम इंडियाला विजयासाठी 79 धावांची गरज
Follow us
| Updated on: Jan 04, 2024 | 3:58 PM

केप टाऊन | दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी विजयासाठी अवघ्या 79 धावांचं आव्हान दिलं आहे. टीम इंडियाकडे 98 धावांची निर्णायक आघाडी होती. तसेच दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या डावात 36.5 ओव्हरमध्ये 176 धावांवर ऑलआऊट केलं. त्यामुळे टीम इंडियाला विजयासाठी फक्त 79 धावा करायच्या आहेत. दक्षिण आफ्रिकेकडून ओपनर एडन मारक्रम याने सर्वाधिक 106 धावा केल्या. तर टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराह याने दक्षिण आफ्रिकेच्या 6 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

एडन मारक्रम आणि डेव्हिड बेडिंगहॅम या जोडीने 62 धावांपासून दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. मात्र त्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला ठराविक अंतराने झटके देत ऑलआऊट केलं. टीम इंडियाकडून बुमराहशिवाय मुकेश कुमार याने 2 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा या दोघांनी 1-1 विकेट घेतली.

हे सुद्धा वाचा

केएल राहुलची चूक 32 धावांनी महागात

दरम्यान टीम इंडियाला विकेटकीपर केएल राहुल याची चूक 32 धावांनी महागात पडली. एकाबाजूला दक्षिण आफ्रिकेचे झटपट विकेट्स जात होते. त्यामुळे टीम इंडियाला माफक आव्हान मिळणार असल्याचं चित्र होतं. मात्र एडन मारक्रम याने एक बाजू लावून धरली. टीम इंडिया एडन मारक्रम याला आऊट करण्याच्या प्रयत्नात होती. ती संधीही टीम इंडियाला मिळाली. मात्र केएल राहुल याने ती संधी गमावली.

बुमराहच्या बॉलिंगवर केएलने एडनचा कॅच सोडला. एडन तेव्हा 74 धावांवर खेळत होता. मात्र एडनने या जीवनदानाचा फायदा घेत 2024 वर्षातील शतक ठोकणारा पहिला फलंदाज ठरण्याचा बहुमान मिळवला. एडनने 106 धावा केल्या. त्यामुळे केएलची कॅच सोडण्याची एक चूक ही टीम इंडियाला 32 धावांनी महागात पडली. केएलने कॅच घेतली असती तर निश्चितच विजयातील अंतर आणखी धावांनी कमी झालं असतं.

टीम इंडियाला इतिहास रचण्यासाठी 79 धावांचं आव्हान

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा आणि मुकेश कुमार

दक्षिण आफ्रिका प्लेईंग इलेव्हन | डीन एल्गर (कॅप्टन), एडन मारक्रम, टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकटेकीपर), मार्को जान्सेन, केशव महाराज, कगिसो रबाडा, नांद्रे बर्गर आणि लुंगी एनगिडी.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.