SA vs IND 2nd Test | शार्दूल ठाकुर खेळणार की मुकणार? कॅप्टन रोहित शर्मा म्हणाला..
South Africa vs India 2nd Test Match | दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या कसोटी सामन्यासह मालिका 2-0 ने जिंकण्याची संधी आहे. तर टीम इंडियाचा मालिका बरोबरीत सोडवण्याचा प्रयत्न असणार आहे. सामन्याआधी हिटमॅनने शार्दुलबाबत मोठी अपडेट दिली.
केप टाऊन | दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया यांच्यात बुधवारी 3 जानेवारीपासून दुसरी आणि अंतिम कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.त्याआधी 1 वाजता टॉस होणार आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर टेम्बा बावुमा याच्याकडे दक्षिण आफ्रिकेची सूत्र आहेत. दक्षिण आफ्रिकेने पहिला सामना जिंकल्याने ते 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे व्हाईट वॉश टाळण्यासाठी टीम इंडियाला हा सामना ड्रॉ किंवा जिंकावा लागेल.
टीम इंडियाचा नववर्षातील हा पहिलाच सामना आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. या सामन्याच्या पूर्वसंध्येला कॅप्टन रोहितने पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांची उत्तर दिली. रोहितने या दरम्यान टीम इंडियाचा ऑलराउंडर शार्दूल ठाकुर याच्या दुखापतीबाबत अपडेट दिली. तसेच शार्दुल दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार की नाही, याबाबतही रोहितने माहिती दिली.
दुसऱ्या कसोटीसाठी शार्दूल ठाकुर फिट असल्याची माहिती रोहितने दिली आहे. त्यामुळे टीम इंडियाला मोठा दिलासा मिळाला आहे. दुसरा कसोटी सामना हा केप टाऊनमधील न्यूलँड्समध्ये आयोजित करण्यात आला आहे. शार्दूलसह इतर खेळाडू पूर्णपणे फिट असल्याचं रोहितने म्हटलं. शार्दुलला थ्रो डाऊनचा सराव करताना दुखापत झाली होती.
टीम इंडियाचे खेळाडू दुखापतीच्या जाळ्यात
दरम्यान टीम इंडियाचे अनेक खेळाडू हे दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडले. मोहम्मद शमी याने माघार घेतली. तर ओपनर ऋतुराज गायकवाड बाहेर पडला. तर ईशान किशन वैयक्तिक कारणांमुळे सहभागी होऊ शकला नाही.
टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अभिमन्यु ईश्वरन, रवीचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), शार्दूल ठाकुर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह, आवेश खान आणि प्रसिद्ध कृष्णा.
दक्षिण आफ्रिका टीम | टेम्बा बावुमा (कर्णधार), डेविड बेडिंघम, नांद्रे बर्गर, एडेन मार्करम, वियान मुल्डर, कगिसो रबाडा, ट्रिस्टन स्टब्स, काइल वेरेन, गेराल्ड कोएट्जी, टोनी डी जोर्जी, डीन एल्गर, मार्को यानसेन, केशव महाराज, लुंगी एनगिडी आणि कीगन पीटरसन.