Virat Kohli | वर्षातील पहिल्याच सामन्यात ‘विराट’ कामगिरी, दिग्गजांना पछाडत मोठा कीर्तीमान
Virat Kohli South Africa vs India 1st Test | विराट कोहली याने नववर्षाची सुरुवात जोरात केलीय. विराटने दक्षिण आफ्रिके विरुद्ध 46 धावा करुन 2 माजी कर्णधारांना मागे टाकलंय.
केप टाऊन | दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामना हा केप टाऊनमधील न्यूलँड्स येथे खेळवण्यात येत आहे. या सामन्यातील पहिल्या दिवशीच टीम इंडियाने धमाकेदार कामगिरी केली. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात 55 धावांवर गुंडाळलं. त्यानंतर टीम इंडियाने समाधानकारक कामिगरी करत पहिल्या डावात 153 धावा केल्या. यामध्ये विराट कोहलीने सर्वाधिक 46 धावांचं योगदान दिलं. विराटने यासह 2024 मध्येही रेकॉर्ड ब्रेक करण्याचा कारनामा सुरु ठेवलाय.
विराट कोहलीने 43 धावा करताच त्याने पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हक आणिन जावेद मियांदाद या दोघांना मागे टाकलंय. इंझमाम याने आपल्या कसोटी कारकीर्दीत 120 सामन्यांमध्ये 8 हजार 830 धावा केल्या आहेत. तर मियांदाद यांनी 124 सामन्यांमध्ये 8 हजार 832 धावा केल्या आहेत. विराट आता या दोघांना मागे टाकून पुढे निघालाय. विराटला इंझमामला मागे टाकण्यासाठी 41 आणि मियांदाद यांना पछाडण्यासाठी 43 धावांची गरज होती. विराटने 44 वी धाव पूर्ण करताच विक्रम केला.
आता विराट कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा 19 वा फलंदाज ठरला आहे. या यादीत टीम इंडियाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर अव्वल स्थानी आहे. सचिन तेंडुलकर याने 15 हजार 921 धावा केल्या आहेत.
पहिल्या दिवसाचा खेळ
दरम्यान दुसऱ्या कसोटीतील पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. दक्षिण आफ्रिका 36 धावांनी पिछाडीवर आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात 55 धावांवर ऑलआऊट करत 153 धावा केल्या. त्यामुळे टीम इंडियाला 98 धावांची आघाडी मिळाली. त्यानंतर पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दुसऱ्या डावात 3 विकेट्स गमावून 62 धावा केल्या आहेत. त्यामुळे दक्षिण आफ्रिका अजून 36 धावांनी पिछाडीवर आहे.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा आणि मुकेश कुमार
दक्षिण आफ्रिका प्लेईंग इलेव्हन | डीन एल्गर (कॅप्टन), एडन मारक्रम, टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकटेकीपर), मार्को जान्सेन, केशव महाराज, कगिसो रबाडा, नांद्रे बर्गर आणि लुंगी एनगिडी.