SA vs IND 3rd Odi Live Streaming | तिसरा एकदिवसीय सामना केव्हा?

South Africa vs India 3rd Odi Live Streaming | दक्षिण आफ्रिका आणि टीम इंडिया या दोन्ही संघांना या 3 सामन्यांच्या मालिकेतील प्रत्येकी एक सामना जिंकलेला आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात दोन्ही संघात चढाओढ पाहायला मिळेल.

SA vs IND 3rd Odi Live Streaming | तिसरा एकदिवसीय सामना केव्हा?
Follow us
| Updated on: Dec 20, 2023 | 4:08 PM

पार्ल | दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील टी 20 मालिका 1-1 ने बरोबरीत राहिली. त्यानंतर उभयसंघातील 3 सामन्यांची मालिका ही देखील 2 सामन्यानंतर 1-1 ने बरोबरीत आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर पहिल्या सामन्यात 8 विकेट्सने मात करत विजयी सलामी दिली. पहिल्या सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाज आणि फलंदाजांनी शानदार कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना चारी मुंडया चित केलं. मात्र असंच सर्वकाही दुसऱ्या साम्यात दक्षिण आफ्रिकेने टीम इंडिया विरुद्ध करत हिशोब बरोबर केला.

दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला दुसऱ्या सामन्यात स्वसतात गुंडाळून 212 धावांचं आव्हान विनादिक्कत 2 विकेट्स गमावून 42.3 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. या सामन्यात दक्षिण आफ्रिका पूर्णपणे टीम इंडियावर वरचढ राहिली. अशाप्रकारे दक्षिण आफ्रिकेने करा या मरा सामन्यात विजय मिळवून मालिकेत 1-1 ने बरोबरी केली. त्यामुळे आता दोन्ही संघांना मालिका जिंकण्याची समसमान संधी आहे. हा तिसरा सामना कधी आणि कुठे पाहता येणार हे जाणून घेऊयात.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया तिसरा एकदिवसीय सामना केव्हा?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया तिसरा एकदिवसीय सामना हा गुरुवारी 21 डिसेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया तिसऱ्या एकदिवसीय सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया तिसऱ्या एकदिवसीय सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया तिसऱ्या एकदिवसीय सामना कुठे?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया तिसऱ्या एकदिवसीय सामना बोलंड पार्क पार्ल येथे आयोजित करण्यात आला आहे.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया तिसऱ्या एकदिवसीय सामना टीव्हीवर कुठे पाहता येणार?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया तिसऱ्या एकदिवसीय सामना हा टीव्हीवर स्टार स्पोर्क्टस नेटवर्क चॅनेल्सवर पाहता येईल.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया तिसऱ्या एकदिवसीय सामना मोबाईलवर कुठे पाहता येणार?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया तिसऱ्या एकदिवसीय सामना मोबाईलवर डिज्नी प्लस हॉटस्टार एपवर मोफत पाहता येईल.

एकदिवसीय मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका टीम | एडन मारक्रम (कॅप्टन), बार्टमॅन, नांद्रे बर्गर, टोनी डी जॉर्जी, रीजा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, मिहाली पोंगवाना, डेविड मिलर, वियान मुल्डर, एंडिले फेहलुकवायो, तबरेज शम्सी, रासी वेन डेर डुसे, कायल वेरेयेन आणि लिजाड विलियम्स.

दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया | केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार, आवेश खान , अर्शदीप सिंग आणि आकाश दीप.

मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.