पार्ल | टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात विजयासाठी 297 धावांचं आव्हान दिलंय. बॅटिंगसाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेने आश्वासक सुरुवात केली. रिझा हेंड्रीक्स आणि टोनी डी झोर्झी या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 59 धावांची भागीदारी केली. त्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला ठराविक अंतराने झटके दिले. दक्षिण आफ्रिकेने दुसरी विकेट 76 आणि तिसरी विकेट 141 धावांवर गमावली. त्यानंतर टीम इंडियाला मोठी विकेट मिळाली.
अर्शदीप सिंह याने दक्षिण आफ्रिकेसाठी दुसऱ्या वनडेत विजयाचा हिरो ठरलेल्या टोनी डी झोर्झी याला 81 धावांवर आऊट करत रोखलं. आधी टोनी डी झोर्झी याला एलबीडब्ल्यू आऊट देण्यास अंपायरने नकार दिला. मात्र रीव्हीव्यूमध्ये तो आऊट होता. त्यामुळे टोनी डी झोर्झी याला 81 धावांवर माघारी जावं लागलं. त्यामुळे दगक्षिण आफ्रिकेची 29.4 ओव्हरमध्ये 4 बाद 161 अशी स्थिती झाली. टीम इंडियाने सामन्यात पुन्हा कमबॅक केलं.
टीम इंडियाला सामन्यात घट्ट पकड मिळवण्यासाठी एका विकेटची गरज होती. टीम इंडियाला पाचवी विकेटही मिळाली. आवेश खान याने आपल्या बॉलिंगवर विकेटकीपर बॅट्समन हेनरिक क्लासेन याला कॅच आऊट केलं. मात्र इथे कौतुक बॉलरपेक्षा जास्त ज्याने कॅच घेतली त्या युवा साई सुदर्शन याचं व्हायला हवं. कारण साई सुदर्शनने शानदार पद्धतीने हवेत झेप घेत अफलातून कॅच घेतला. त्यामुळे टीम इंडियाला पाचवी विकेट मिळाली. हेनरिक क्लासेनला 21 धावांवर मैदानाबाहेर जावं लागलं.
साई सुदर्शनचा कडक कॅच
Sai Sudharsan has taken a blinder. 🫡pic.twitter.com/viiJiVe8S5
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 21, 2023
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), संजू सॅमसन, साई सुदर्शन, रजत पाटीदार, तिलक वर्मा, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आवेश खान आणि मुकेश कुमार.
दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | एडन मारक्रम (कॅप्टन), टोनी डी झोर्झी, रीझा हेंड्रिक्स, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, केशव महाराज, नांद्रे बर्गर, लिझाद विल्यम्स आणि ब्यूरन हेंड्रिक्स.