SA vs IND 3rd T20I Live Streaming | टीम इंडियासाठी तिसरा सामना महत्त्वाचा, कुठे पाहता येणार?

South Africa vs India 3rd T20I Live Streaming | मालिकेतील पहिला सामना वाया गेल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने दुसरा सामना जिंकत विजयाचं खातं उघडलं. त्यामुळे टीम इंडियासाठी तिसरा सामना हा अतिशय महत्त्वाचा आहे.

SA vs IND 3rd T20I Live Streaming | टीम इंडियासाठी तिसरा सामना महत्त्वाचा, कुठे पाहता येणार?
Follow us
| Updated on: Dec 13, 2023 | 3:31 PM

जोहान्सबर्ग | दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील पहिला टी 20 सामना हा पावसामुळे रद्द करावा लागला. त्यानंतर 12 डिसेंबर रोजी उभयसंघात पावसाच्या व्यत्ययासह सामना पार पडला. पावसामुळे 15 ओव्हरच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी डीएलएसनुसार 15 ओव्हरमध्ये 154 धावांचं आव्हान मिळालं. दक्षिण आफ्रिकेने हे आव्हान 5 विकेट्स गमावून 7 बॉलआधी पूर्ण केलं. दक्षिण आफ्रिकेने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

दक्षिण आफ्रिकेने विजयासह मालिका कायम राखण्यात यश मिळवलंय. त्यामुळे दक्षिण आफ्रिका कोणत्याही परिस्थितीत मालिका गमावणार नाही. मात्र दुसऱ्या बाजूला टीम इंडियाने दुसरा सामना गमावल्याने तिसरा सामना हा करो या मरो असा झाला आहे. टीम इंडियाला मालिका गमवायची नसेल, तर कोणत्याही परिस्थितीत तिसरा सामना जिंकावाच लागणार आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा चांगलाच कस लागणार आहे. हा तिसरा सामना कुठे पाहता येणार हे आपण जाणून घेऊयात.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया तिसरा टी 20 सामना केव्हा?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया तिसरा टी 20 सामना गुरुवारी 14 डिसेंबर रोजी होणार आहे.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया तिसरा टी 20 कुठे?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया तिसऱ्या टी 20 सामन्याचं आयोजन हे बोलंड पार्क पार्ल येथे करण्यात आलं आहे.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया तिसऱ्या टी 20 सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया तिसऱ्या टी 20 सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 8 वाजता टॉस होणार आहे.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया तिसरा टी 20 सामना टीव्हीवर कुठे पाहता येणार?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया तिसरा टी 20 सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया तिसरा टी 20 सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया तिसरा टी 20 सामना मोबाईलवर डिज्नी प्लेस हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.

दक्षिण आफ्रिका 20 टीम | एडेन मार्करम (कर्णधार), बार्टमॅन, मॅथ्यू ब्रीटक्जे, नांद्रे बर्गर, डोनोवॅन फरेरिया, रीजा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, डेविड मिलर, एंडिले फेहलुकवायो, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, लिजाड विलियम्स, गेराल्ड कोएत्झी, मार्को जानेसन आणि लुंगी एन्गिडी. (शेवटच्या तिघांना पहिल्या 2 सामन्यांसाठी संधी)

टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया | सूर्यकुमार यादव (कॅप्टन), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), यशस्वी जयसवाल, शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि दीपक चाहर.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.