SA vs IND : दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला, टीम इंडियाकडून 1 बदल, बॅटिंग कुणाची?

South Africa vs India 3rd T20i Toss : दक्षिण आफ्रिकेने सेंच्युरियन येथे खेळवण्यात येणार्‍या सामन्यात टॉस जिंकला आहे. पाहा टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेची प्लेइंग ईलेव्हन.

SA vs IND : दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला, टीम इंडियाकडून 1 बदल, बॅटिंग कुणाची?
South Africa vs India 3rd T20i TossImage Credit source: Bcci x Account
Follow us
| Updated on: Nov 13, 2024 | 8:35 PM

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक टी 20I सामन्याचं आयोजन हे सेंच्युरियन येथील स्पोर्ट्सपार्क येथे करण्यात आलं आहे. या 4 सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघांनी प्रत्येकी 1 सामना जिंकला आहे. त्यामुळे दोन्ही संघांकडे हा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याची संधी आहे. या तिसऱ्या सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.तर त्याआधी 8 वाजता टॉस झाला. दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कॅप्टन एडन मार्करम याने फिल्डिंगचा निर्णय घेत पुन्हा टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.

दोन्ही संघात 1 बदल

या तिसऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघात प्रत्येकी 1-1 बदल करण्यात आला आहे. न्काबायोमझी पीटर याच्या जागी लुथो सिपामला याचा समावेश करण्यात आला आहे. तर टीम इंडियातून ओपनर अभिषेक शर्मा याला डच्चू देण्यात येणार असल्याची चर्चा होती. अभिषेकला गेल्या काही डावांमध्ये खास करता आलं नाही. त्यामुळे त्याचा पत्ता कट होण्याची शक्यता होती. मात्र कर्णधार सूर्याने अभिषेकवर विश्वास दाखवत त्याला कायम ठेवलंय. तर दुसर्‍या बाजूला वेगवान गोलंदाज आवेश खान याला बाहेर करुन रमणदीप सिंह याला पदार्पणाची संधी दिली आहे. हार्दिक पंड्या याने रमणदीप सिंह याला कॅप देत त्याचं भारतीय संघात स्वागत केलं आणि शुभेच्छा दिल्या

टीम इंडिया वचपा घेणार?

दरम्यान टीम इंडियाकडे सेंच्युरियन येथे दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत मालिकेत आघाडी घेण्यासह 6 वर्षांपूर्वीच्या पराभवाचा वचपा घेण्याची संधी आहे. दक्षिण आफ्रिकेने फेब्रुवारी 2018 मध्ये झालेल्या टी 20i सामन्यात भारताचा पराभव केला होता.

दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई आणि वरुण चक्रवर्ती.

दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन: एडन मार्करम (कॅप्टन), रायन रिकेल्टन, रीझा हेंड्रिक्स, ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, अँडिले सिमेलेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज आणि लुथो सिपामला.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....