Sanju Samson क्लिन बोल्ड, सलग दुसऱ्यांदा झिरोवर आऊट, यान्सेनकडून दांडी गुल

Sanju Samson Duck : टी 20i क्रिकेटमध्ये सलग 2 शतकं ठोकणारा संजू सॅमसन सलग 2 वेळा झिरोवर आऊट झालाय. संजूला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी 20i सामन्यात मार्को यान्सेन याने आऊट केलं.

Sanju Samson क्लिन बोल्ड, सलग दुसऱ्यांदा झिरोवर आऊट, यान्सेनकडून दांडी गुल
sanju samson duck sa vs ind 3rd t20i
Follow us
| Updated on: Nov 13, 2024 | 9:19 PM

टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन संजू सॅमसन याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20i मालिकेची अफलातून सुरुवात केली. संजूने डर्बनमध्ये शतक केलं. संजूचं हे टी 20i कारकीर्दीतील एकूण आणि सलग दुसरं शतक ठरलं. संजू सलग 2 टी 20i शतक झळकावणारा पहिला भारतीय ठरला. मात्र त्यानंतर संजू पुन्हा एकदा फ्लॉप ठरला आहे. संजू सलग 2 शतकांनंतर सलग 2 वेळा भोपळा फोडण्यात अपयशी ठरला आहे. संजू दुसऱ्या सामन्यानंतर आता सेंच्युरियनमधील तिसर्‍या सामन्यातही खातं उघडण्यात अपयशी ठरलाय.

दुसऱ्या बॉलवर पहिला झटका

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करम याने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी भाग पाडलं. अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन ही सलामी जोडी मैदानात आली. संजूने स्ट्राईक घेतली. मार्को जान्सेन याने पहिल्या बॉल डॉट टाकला. त्यानंतर दुसर्‍याच बॉलवर संजूचा स्टंप उडवला आणि त्याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

अभिषेक-तिलकचा झंझावात

संजू सॅमसन आऊट झाल्यानंतर अभिषेक शर्मा आणि वन डाऊन आलेल्या तिलक वर्मा या दोघांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई करायला घेतली. या दोघांनी मैदानात चौफेर फटकेबाजी केली. या दोघांनी पावर प्लेचा पूर्ण फायदा घेतला. या जोडीने 6 ओव्हरमध्ये 70 धावा केल्या. अभिषेक शर्मा 16 बॉलमध्ये 37 रन्सवर नॉट आऊट आहे. तर तिलक वर्मा 19 चेंडूत 26 धावा करुन नाबाद आहे. आता ही जोडी टीम इंडियाला कुठवर पोहचवते? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

संजूने केएलला पछाडलं

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई आणि वरुण चक्रवर्ती.

दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन: एडन मार्करम (कॅप्टन), रायन रिकेल्टन, रीझा हेंड्रिक्स, ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, मार्को यान्सेन, अँडिले सिमेलेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज आणि लुथो सिपामला.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....