SA vs IND : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बॅटिंग, भारताच्या बाजूने नाणेफेकीचा कौल, प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण?
South Africa vs India 4th T20i Toss: कॅप्टन सूर्यकुमार यादव याने या मालिकेत सलग 3 वेळा नाणेफेक गमावल्यानंतर अखेर शेवटच्या आणि चौथ्या सामन्यात टॉस जिंकला आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा आणि अखेरचा टी 20i सामना हा द वांडरर्स स्टेडियम जोहान्सबर्ग येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 8 वाजता टॉस झाला. कॅप्टन सूर्यकुमार यादव याने नाणेफेक जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांसाठी हा अंतिम सामना महत्त्वाचा आहे. टीम इंडिया या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडियाकडे ही मालिका जिंकण्याची संधी आहे. तर दक्षिण आफ्रिकेसमोर ही मालिका बरोबरीत सोडवण्याचं आव्हान आहे. त्यामुळे या सामन्यात चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
दोन्ही टीम अनचेंज
दोन्ही संघांनी या अंतिम सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. दोन्ही कर्णधारांनी आपल्या त्याच खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे. दक्षिण आफ्रिका या मालिकेत 1-2 ने पिछाडीवर असल्याने त्यांच्यावर मायदेशात मालिका पराभवाची टांगती तलवार आहे. अशात यजमांनांचा हा सामना जिंकून मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवण्याचा प्रयत्न असणार आहे. तर टीम इंडिया सामन्यासह मालिका विजयाच्या हिशोबाने मैदानात उतरणार आहे. आता या दोघांपैकी कुणाचा विजय होतो? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.
आकडे कुणाच्या बाजूने?
दरम्यान उभयसंघातील हा एकूण 31 वा टी 20i सामना आहे. भारताने या 30 पैकी 17 तर दक्षिण आफ्रिकेने 12 सामने जिंकले आहेत. तर 1 सामना बरोबरीत राहिला आहे. तसेच भारताचा हा जोहान्सबर्ग येथील हा एकूण सातवा टी 20i सामना आहे. भारताने या 6 पैकी 4 वेळा विजय मिळवलाय. तर 2 वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे.
टीम इंडिया टॉसचा बॉस
🚨 Toss Update 🚨
Captain @surya_14kumar wins the toss and #TeamIndia elect to bat in the final T20I 👌👌
Live – https://t.co/b22K7t9imj#SAvIND pic.twitter.com/8WWKoVMRpZ
— BCCI (@BCCI) November 15, 2024
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई आणि वरुण चक्रवर्ती.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन: एडन मार्करम (कॅप्टन), रायन रिकेल्टन, रीझा हेंड्रिक्स, ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, मार्को यान्सेन, अँडिले सिमेलेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज आणि लुथो सिपामला.