SA vs IND Playing 11 | आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेइंग 11, द्रविडचा मोठा खुलासा
IND vs SA Playing 11 : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेच्या मालिकेला कधी एकदा सुरूवात होते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. या मालिकेमधील पहिला कसोटी सामना दोन दिवसांनी होणार आहे.
मुंबई : साऊथ आफ्रिका आणि टीम इंडिया यांच्यातील कसोटी मालिकेला सुरूवात व्हायला अवघे दोन दिवस बाकी आहेत. मालिकेतील पहिला सामना 26 डिसेंबरला होणार आहे. सेंच्यरियन येथे हा सामना पार पडणार असून दुपारी 1.30 वाजता सामना सुरू होईल. पहिल्या कसोटी सामन्यासाठी प्लेइंग 11 मध्ये कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आज रविवारी झालेल्या सराव सत्रानंतर कोच राहुल द्रविडने प्लेइंगमध्ये कोण असणार याचे जवळपास संकेत दिले आहेत.
काय म्हणाला राहुल द्रविड?
राहुल द्रविडला विकेटकीपरबाबत केलेल्या प्रश्नावर बोलताना, केएल राहुलने विकेट किपिंग करणार असल्याचं सांगितलं आहे. वन डे मालिकेतही विकेटकीपर जबाबदारी सांभाळली आहे त्यामुळे कसोटी मालिकेतील सर्वात अवघड टास्क त्याच्याकडे असणार असल्याचं सांगितलं. के एल राहुल याने ओपनर म्हणून सुरूवात केली होती मात्र दुखापतीतूव सावरल्यावर त्याने मिडल ऑर्डरला बॅटींग करण्याचा मोठा निर्णय घेतलाय. टीम इंडियाकडून खेळताना आता तो मिडल ऑर्डरचा नियमित फलंदाज झाला आहे.
साऊथ आफ्रिका आणि टीम इंडियामधील पहिला सामना सेंच्युरियन या ठिकणी होणार आहे. या मैदानाचा पिच रिपोर्ट पाहता सुरूवातीला गोलंदाज तर त्यानंतर स्पिनर्सला मदत मिळणार असल्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. त्यामुळे टीम इंडिया पहिल्या कसोटी सामन्यामध्ये खाली दिलेला संघ उतरवण्याची शक्यता आहे.
पहिल्या कसोटीसाठा टीम इंडिया प्लेइंग 11-:
रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, प्रसिद्ध कृष्णा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
टीम इंडिया : रोहित शर्मा (C), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अभिमन्यू ईश्वरन, केएल राहुल (WK), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (VC) प्रसिध कृष्णा आणि केएस भरत (WK).