आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 फायनलमध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका विरुद्ध 7 धावांनी विजय मिळवला आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 177 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेला 8 विकेट्स गमावून 169 धावांपर्यंतच मजल मारता आली. टीम इंडियाची रोहित शर्माच्या नेतृत्वात पहिली आणि अंतिम फेरीत खेळण्याची ही तिसरी वेळ होती. तर दक्षिण आफ्रिकेची ही वर्ल्ड कप इतिहासात फायनलमध्ये खेळण्याची ही पहिलीच वेळ होती. दोन्ही संघांना जिंकण्याची समसमान संधी होती. मात्र टीम इंडियाने सामन्यात अखेरच्या क्षणी जोरात कमबॅक केलं आणि इतिहास रचला. टीम इंडिया टी 20 वर्ल्ड कप जिंकण्याची ही 2007 नंतरची पहिली आणि एकूण दुसरी वेळ ठरली. तर टीम इंडियाने टी वर्ल्ड कप जिंकत 2013 नंतर आयसीसी ट्रॉफीची प्रतिक्षा संपवली. टीम इंडियाने 2013 साली चॅम्पियन ट्रॉफी जिंकली होती.
टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या कॅप्टन्सीत दक्षिण आफ्रिकेवर अंतिम सामन्यात 7 धावांनी मात करत टी 20 वर्ल्ड कप चॅम्पियन ठरली आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 177 धावांचं आव्हान दिलं होतं. दक्षिण आफ्रिकेने अडखळत झालेल्या सुरुवातीनंतर जोरदार कमबॅक करत सामन्यावर घटट् पकड मिळवली होती. मात्रा अखेरच्या काही षटकात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कमाल बॉलिंग करत अफलातून कमबॅक केलं आणि दक्षिण आफ्रिकेला 20 ओव्हरमध्ये 8 बाद 169 धावावंर रोखण्यात यश मिळवलं. टीम इंडियाने यासह टी 20 वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं. टीम इंडियाने 2007 नंतर टी 20 वर्ल्ड कप आणि आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2013 नंतर तब्बल 11 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आयसीसी ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं.
भारताने 11 वर्षानंतर आयसीसी ट्रॉफी जिंकली आहे. भारताने 7 धावांनी हा सामना जिंकला आहे. या सामन्यात जसप्रीत बुमराहने जबरदस्त गोलंदाजी करत टीम इंडियाला कमबॅक करून दिलं.
सूर्यकुमार यादवने जबरदस्त झेल घेतला. या कॅचमुळे टीम इंडिया गेममध्ये आली आहे. दक्षिण अफ्रिकेला 5 चेंडूत 16 धावांची आवश्यकता आहे.
जसप्रीत बुमराहने मार्को यान्सेन याला बोल्ड केलं आहे. दक्षिण आफ्रिकेने सहावी विकेट गमावली आहे. सामना रंगतदार स्थितीत पोहचला आहे.
हार्दिक पंड्याने हेन्रिक क्लासेन याला आऊट केलंय. क्लासेनच्या रुपात दक्षिण आफ्रिकेने पाचवी विकेट गमावली आहे. क्लासेनने 27 बॉलमध्ये 52 धावा केल्या.
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला चौथा धक्का दिला आहे. अर्शदीप सिंहच्या बॉलिंगवर कुलदीप यादव याने क्विंटन डी कॉकचा कॅच घेतला. डी कॉकने 31 बॉलमध्ये 39 धावा केल्या.
टीम इंडियाने दुसरी विकेट मिळवली आहे. अर्शदीप सिंहने दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन एडन मार्रक्रम याला विकेटकीपर ऋषभ पंतच्या हाती कॅच आऊट केलं. मार्रक्रमने 4 धावा केल्या.
जसप्रीत बुमराहने रिझा हेंड्रिक्सला क्लिन बोल्ड करत दक्षिण आफ्रिकेला पहिला झटका दिला आहे. हेंड्रिक्सने 4 धावा केल्या.
दक्षिण आफ्रिकेची सलामी जोडी 177 धावांचा पाठलाग करायला मैदानात आली आहे. रिझा हेंड्रिक्स आणि क्विंटन डी कॉक सलामी जोडी मैदानात आली आहे.
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 177 धावांचं आव्हान दिलं आहे. टीम इंडियाकडून विराट कोहली 76, अक्षर पटेल 47 आणि शिवम दुबे याने केलेल्या 27 धावांच्या जोरावर टीम इंडियाने 7 विकेट्स गमावून 20 ओव्हरमध्ये 176 धावा केल्या. तर दक्षिण आफ्रिकेकडून एनरिख नॉर्खिया आणि केशव महाराज या दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर कगिसो रबाडा आणि मार्को जान्सेन या दोघांनी 1-1 विकेट घेतली.
विराट कोहलीने 59 बॉलमध्ये 6 फोर आणि 2 सिक्ससह 76 रन्स केल्या. विराटला संपूर्ण स्पर्धेत आपल्या लौकीकाला साजेशी खेळी करता आली नाही. मात्र विराटने निर्णायक क्षणी अंतिम सामन्यात 76 धावा करत टीम इंडियासाठी संकटमोचक ठरला.
विराट कोहलीने टी 20 वर्ल्ड कप 2024 फायनलमध्ये अर्धशतक ठोकलंय. मात्र विराटने अर्धशतकासाठी 48 बॉलचा सामना केला आहे. त्यामुळे विराटने संथ अर्धशतक केल्याचं म्हटलं जात आहे.
टीम इंडियाने 10 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 75 धावा केल्या आहेत. रोहित, पंत आणि सूर्यकुमार आऊट झाल्याने टीम इंडियाची स्थिती 3 बाद 34 अशी झाली होती. मात्र त्यानंतर विराट आणि अक्षर पटेल या दोघांनी टीम इंडियाचा डावा सावरला. आता या दोघांकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.
टीम इंडियाने तिसरी विकेट गमावली आहे. सूर्यकुमार यादव मोठा फटका मारण्याच्या नादात कॅच आऊट झाला आहे. कगिसो रबाडा याने आपल्या बॉलिंगवर सूर्याला हेन्रिक क्लासेनच्या हाती कॅच आऊट केला.
टीम इंडियाने चांगल्या सुरुवातीनंतर एकाच ओव्हरमध्ये झटपट 2 विके्टस गमावल्या आहेत. केशव महाराजने आधी रोहितला हेन्रिक क्लासेन आणि ऋषभ पंत या दोघांना आऊट केलंं. रोहितने 9 धावा केल्या. तर ऋषभ पंत भोपळाही फोडू शकला नाही.
टीम इंडियाने पहिली आणि मोठी विकेट गमावली आहे. कॅप्टन रोहित शर्मा 9 धावा करुन कॅच आऊट झाला आहे. केशव महाराज याने आपल्या बॉलिंगवर रोहितला हेन्रिक क्लासेन याच्या हाती कॅच आऊट केलं.
दक्षिण आफ्रिका टीम इंडिया फायनलला सुरुवात झाली आहे. विराट कोहली आणि कॅप्टन रोहित शर्मा सलामी जोडी मैदानात आली आहे.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, नॉर्खिया नॉर्टजे आणि तबरेझ शम्सी.
टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कप 2024 महाअंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिके विरुद्ध टॉस जिंकला आहे. कॅप्टन रोहित शर्मा याने बॅटिंगचा निर्णय घेत दक्षिण आफ्रिकेला फिल्डिंगसाठी भाग पाडलं आहे. कॅप्टन रोहितने या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी 20 वर्ल्ड कप 2024 फायनल सामन्याला सुरुवात होण्यासाठी अवघे काही मिनिटं बाकी आहेत. सामन्याला रात्री 8 वादता सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. टॉससाठी क्रिकेट चाहते उत्सुक आहेत.
टीम इंडियासाठी या टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत कॅप्टन रोहित शर्मा याने सर्वाधिक 248 धावा केल्या आहेत. तर अर्शदीप सिंहने 15 विकेट्स घेतल्या आहेत. दोघांनी ही कामगिरी गेल्या 7 सामन्यांमध्ये केली आहे.
दक्षिण आफ्रिकेने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 फायनलसाठी जोरदार सराव केला आहे. आयसीसीने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा नेट्समध्ये सरावा करतानाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
दक्षिण आफ्रिका फायनलसाठी सज्ज
The Proteas are gearing up for the #T20WorldCup 2024 Final 💪 #SAvIND #T20WorldCup pic.twitter.com/qyfwBOoFjF
— ICC (@ICC) June 28, 2024
केन्सिंग्टन ओव्हलची खेळपट्टी प्रॉव्हिडन्सच्या खेळपट्टीपेक्षा वेगळी आहे. खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना सुरुवातीला मदत करते. नवीन चेंडू टाकताना स्विंग मिळेल. नंतर ही खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त ठरते.
टीम इंडिया टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत अजिंक्य आहे. टीम इंडियाने या स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. टीम इंडियाने साखळी फेरीतील 4 पैकी 3 सामने जिंकले. तर एक सामना पावसामुळे रद्द झाला. तर सुपर 8 मध्ये टीम इंडियाने विजयी घोडदौड कायम राखली. तर उपांत्य फेरीत इंग्लंडचा धुव्वा उडवत फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
दक्षिण आफ्रिका टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत अजिंक्य आहे. दक्षिण आफ्रिकेने साखळीतील 4 आणि सुपर 8 मधील 3 सामने जिंकले. तसेच उपांत्य फेरीत अफगाणिस्तानवर मात करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे.
आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत उभयसंघात एकूण 6 वेळा आमनासामना झालाय. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर 6 पैकी 4 सामन्यात विजय मिळवला आहे. तर दक्षिण आफ्रिकेला 2 सामन्यात विजय मिळवता आला आहे.
टीम इंडिया -दक्षिण आफ्रिका यांच्यात एकूण 26 टी20i सामने झाले आहेत. टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेवर वरचढ राहिली आहे. टीम इंडियाने 26 पैकी 14 सामन्यात विजय मिळवला आहे. तर दक्षिण आफ्रिकेला 11 सामन्यात यश मिळवता आलं आहे.
टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
दक्षिण आफ्रिका टीम : एडन मार्करम (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, ॲनरिक नॉर्टजे, तबरेझ शम्सी, ओटनील बार्टमन, गेराल्ड कोएत्झी, ब्योर्न फॉर्च्युइन आणि रायन रिकेल्टन.
आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 फायनलमध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया यांच्यात अंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. तर 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. या सामन्याचं आयोजन हे केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन, बार्बाडोस येथे करण्यात आलं आहे.