SA vs IND | दक्षिण आफ्रिका-टीम इंडिया मालिकेसाठी कॅप्टनची उचलबांगडी

India vs South Africa | टीम इंडिया-दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी 20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम मॅनेजमेंटने मोठा निर्णय घेतला आहे. दोन्ही मालिकेत नियमित कर्णधाराऐवजी टीममधील दुसऱ्या खेळाडूला कर्णधारपदाची सूत्र देण्यात आली आहेत.

SA vs IND | दक्षिण आफ्रिका-टीम इंडिया मालिकेसाठी कॅप्टनची उचलबांगडी
Follow us
| Updated on: Dec 04, 2023 | 3:16 PM

केप टाऊन | ऑस्ट्रेलियाला टी 20 मालिकेत धुळ चारल्यानंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका दौऱ्यात टी 20, वनडे आणि टेस्ट सीरिज खेळणार आहे. या तिन्ही मालिकांसाठी काही दिवसांपूर्वीच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. तर आता दक्षिण आफ्रिकेने तिन्ही सीरिजसाठी स्क्वॉड जाहीर केला आहे. टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याची सुरुवात ही टी 20 मालिकेने होणार आहे. त्यानंतर वनडे सीरिज होणार आहे. तर टेस्ट सीरिजने या दौऱ्याची सांगता होणार आहे.

दक्षिण आफ्रिकेने टीम इंडिया विरुद्धच्या पहिल्या 2 अर्थात टी 20 आणि वनडे सीरिजसाठी कॅप्टन बदलला आहे. दक्षिण आफ्रिकेने नियमित कर्णधार टेम्बा बावुमा याची उचलबांगडी केली आहे. तर एडन मारक्रम याला या दोन्ही मालिकांसाठी कर्णधार म्हणून संधी दिली आहे. मात्र टेम्बा कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेचं कर्णधारपद सांभाळणार आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेट टीमच्या अधिकृत एक्स अकाउंटवरुन याबाबतची माहिती दिली आहे.

टी 20 सीरिजसाठी दक्षिण आफ्रिका टीम | एडन मार्करम (कर्णधार), बार्टमॅन, मॅथ्यू ब्रीटक्जे, नांद्रे बर्गर, डोनोवॅन फरेरिया, रीजा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, डेविड मिलर, एंडिले फेहलुकवायो, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, लिजाड विलियम्स, गेराल्ड कोएत्झी, मार्को जानेसन आणि लुंगी एन्गिडी. (शेवटच्या तिघांना पहिल्या 2 सामन्यांसाठी संधी)

एकदिवसीय मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका टीम | एडन मारक्रम (कॅप्टन), बार्टमॅन, नांद्रे बर्गर, टोनी डी जॉर्जी, रीजा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, मिहाली पोंगवाना, डेविड मिलर, वियान मुल्डर, एंडिले फेहलुकवायो, तबरेज शम्सी, रासी वेन डेर डुसे, कायल वेरेयेन आणि लिजाड विलियम्स.

टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया | सूर्यकुमार यादव (कॅप्टन), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), यशस्वी जयसवाल, शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि दीपक चाहर.

दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघ | केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि दीपक चहर.

टी 20 सीरिजचं वेळापत्रक

पहिला सामना, 10 डिसेंबर, डरबन, रात्री साडे नऊ वाजता

दुसरा सामना, 12 डिसेंबर, रात्री साडे नऊ वाजता

तिसरा सामना, 14 डिसेंबर, जोहान्सबर्ग, रात्री साडे नऊ वाजता

वनडे सीरिजचं वेळापत्रक

पहिला सामना, 17 डिसेंबर, जोहान्सबर्ग, दुपारी दीड वाजता.

दुसरा सामना, 19 डिसेंबर, दुपारी साडे चार वाजता.

तिसरा सामना, 21 डिसेंबर, दुपारी साडे चार वाजता.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.