SA vs IND | दुसऱ्या कसोटीनंतर स्टार बॅट्समनचा कसोटी क्रिकेटला रामराम
South Africa vs India 2nd Test | टीम इंडियाने नववर्षाची धडाक्यात सुरुवात केली आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत मालिका 1-1 ने बरोबरीत राखण्यात यश मिळवलंय. मात्र दुसऱ्या बाजूला अनुभवी फलंदाज निवृत्त झाला आहे.
केप टाऊन | दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया यांच्यात न्यूलँड्स केप टाऊन येथे कसोटी मालिकेतील दुसरा आणि अंतिम सामना पार पडला. टीम इंडियाने सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी दक्षिण आफ्रिकेवर 7 विकेट्सने विजय मिळवला. टीम इंडियाने 3 विकेट्स गमावून 79 धावांचं सोपं आव्हान हे पूर्ण केलं. टीम इंडियाला या विजयासह 2 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत सोडवण्यात यश आलं. या दुसऱ्या सामन्यानंतर स्टार बॅट्समन कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे.
दक्षिण आफ्रिकेचा डीन एल्गर याने कसोटी क्रिकेटला रामराम केला आहे. डीनने या कसोटी मालिकेनंतर निवृत्त होणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार आता डीन कसोटी क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार नाही. दक्षिण आफ्रिकेचा नियमित कर्णधार टेम्बा बावुमा याला पहिल्या सामन्यात दुखापत झाली. त्यामुळे दुसऱ्या कसोटीतून तो बाहेर पडला. यामुळे डीन एल्गर याला अखेरच्या कसोटी सामन्यात नेतृत्व करण्याची संधी मिळाली. मात्र दक्षिण आफ्रिकेला डीनला विजयी निरोप देता आला नाही.
डीन एल्गरला आपल्या अखेरच्या कसोटीत बॅटिंगने विशेष काही करता आलं नाही. एल्गर पहिल्या डावात 4 आणि दुसऱ्या डावात 12 धावा करुन आऊट झाला. मोहम्मद सिराज याने एल्गरला पहिल्या डावात क्लिन बोल्ड केलं. तर दुसऱ्या डावात मोहम्मद सिराज याने विराट कोहली याच्या हाती कॅच आऊट केलं. एल्गर आऊट झाल्यानंतर विराटने एल्गरला मीठी मारली. विराटने यासह खिलाडू वृ्त्तीच दर्शन घडवलं.
डीन एल्गरची कसोटी कारकीर्द
Team India congratulated Dean Elgar on a superb career!pic.twitter.com/LfeiBIBIzJ
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 3, 2024
डीन एल्गर याने 85 कसोटी सामन्यांमधील 150 डावांमध्ये 5 हजार 331 धावा केल्या आहेत. डीनने या दरम्यान 14 शतकं आणि 23 अर्धशतकं झळकावली आहेत. डीनची 199 ही सर्वोच्च कामगिरी आहे. तसेच डीनने 15 विकेट्सही घेतल्या आहेत.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा आणि मुकेश कुमार.
दक्षिण आफ्रिका प्लेईंग इलेव्हन | डीन एल्गर (कॅप्टन), एडन मारक्रम, टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकटेकीपर), मार्को जान्सेन, केशव महाराज, कगिसो रबाडा, नांद्रे बर्गर आणि लुंगी एनगिडी.