IND vs SA Head To Head Records | टी20 फॉर्मेटमध्ये दोघांपैकी कोण सरस? पाहा टीम इंडियाचे आकडे
South Africa vs India T20I Head To Head Records | टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याची सुरुवात ही टी 20 मालिकेने होत आहे. उभयसंघात एकूण 3 सामन्यांची मालिका होणार आहे. दोन्ही संघांपैकी टी 20 सीरिजमध्ये कोणती टीम ही वरचढ आहे हे आपण जाणून घेऊयात.
डरबन | दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील टी 20 मालिकेतील पहिला सामना हा आज 10 डिसेंबर रोजी पार रडणार आहे. या सलामीच्या सामन्यासाठी दोन्ही संघ तयार आहेत. टीम इंडियाने नुकतंच होम सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाचा 4-1 ने धुव्वा उडवला. त्यामुळे टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडचा विश्वास चांगलाच दुणावलेला आहे. या मालिकेच्या निमित्ताने दक्षिण आफ्रिका- टीम इंडिया यांच्यात टी 20 मध्ये सरस कोण आहे, हे आपण आकड्यांद्वारे जाणून घेऊयात. टीम इंडियाचा टी 20 क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिके विरुद्ध बोलबाला राहिला आहे. दक्षिण आफ्रिकेत खेळो अथवा भारतात, टीम इंडियाच आतापर्यंत वरचढ राहिली आहे.
8 मालिका आणि 24 सामने
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत 8 टी 20 मालिका खेळवण्यात आल्या आहेत. या 8 टी 20 मालिकेत एकूण 24 सामने झाले आहेत. या 24 पैकी 13 सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला आहे. तर दक्षिण आफ्रिकेला 10 सामन्यात विजय मिळवता आलाय. टीम इंडियाच्या तुलनेत दक्षिण आफ्रिका फार मागे नाही. उभयसंघातील गेल्या 3 टी 20 सामन्यांपैकी दक्षिण आफ्रिकेने 2 आणि टीम इंडियाने 1 सामन्यात विजय मिळवलाय.
दक्षिण आफ्रिकेत किती टी 20?
तसेच दोन्ही संघात आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेत एकूण 7 टी 20 सामने झाले आहेत. या 7 पैकी टीम इंडियाने 5 सामने जिंकलेत. तर दक्षिण आफ्रिकेला 2 वेळा टीम इंडियाला पराभूत करण्यात यश आलं आहे. त्यामुळे एकूणच टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेवर वरचढ आहे.
दक्षिण आफ्रिका 20 टीम | एडेन मारक्रम (कर्णधार), बार्टमॅन, मॅथ्यू ब्रीटक्जे, नांद्रे बर्गर, डोनोवॅन फरेरिया, रीजा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, डेविड मिलर, एंडिले फेहलुकवायो, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, लिजाड विलियम्स, गेराल्ड कोएत्झी, मार्को जानेसन आणि लुंगी एन्गिडी. (शेवटच्या तिघांना पहिल्या 2 सामन्यांसाठी संधी)
टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया | सूर्यकुमार यादव (कॅप्टन), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), यशस्वी जयसवाल, शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि दीपक चाहर.