SA vs IND 2ND T20I | दुसऱ्या टी 20 सामन्यात टीम इंडियाचा हा खेळाडू खेळणार नाही!

South Africa vs India 2nd T20I | आगामी टी 20 वर्ल्ड कप 2024 च्या हिशोबाने टीम इंडियासाठी प्रत्येक सामना हा अतिशय महत्त्तावाचा आहे. मात्र टीम इंडियाचा एका खेळाडूला इच्छा असूनही नाईलाजाने सामन्यातून माघार घ्यावी लागणार आहे.

SA vs IND 2ND T20I | दुसऱ्या टी 20 सामन्यात टीम इंडियाचा हा खेळाडू खेळणार नाही!
Follow us
| Updated on: Dec 11, 2023 | 8:27 PM

केप टाऊन |  टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील पहिल्या टी 20 मालिकेतील पहिला सामना हा पावसाच्या नावावर राहिला. डरबनमध्ये आयोजित करण्यात आलेला सामना हा पावसाने जिंकला. एकूण 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्यात सामन्यात पावसाने खोडा घातला. आता दुसऱ्या सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष आहे. हा सामना 12 डिसेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे. या सामन्याआधी टीम इंडियाच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा बॉलर खेळणार नसल्याचं जवळपास निश्चित झालं आहे.

टीम इंडियाचा बॉलिंग ऑलराउंडर दीपक चाहर दुसऱ्या टी 20 सामन्यात खेळणार नसल्याचं म्हटलं जात आहे. दीपक अजून दक्षिण आफ्रिकेत पोहचलेला नाही. दीपक टी 20 मालिकेतूनही माघार घेऊ शकतो. दीपकच्या वडिलांची प्रकृती गंभीर असल्याने तो खेळू शकत नाही. दीपक यामुळेच ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या टी 20 सामन्यातही खेळला नव्हता.

दीपक चाहर बॉलिंग ऑलराउंडर आहे. दीपकमध्ये बॉलिंगसह कडक बॅटिंग करण्याची क्षमता आहे. दीपकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2 अर्धशतकं झळकावली आहे. यावरुन दीपक बॅटिंगमध्येही सक्षम आहे हे ठळकपणे स्पष्ट होतं. दीपक दुखापतीनंतर अनेक महिन्यांनी टीम इंडियात कमबॅक केलं होतं. मात्र आता वडिलांच्या तब्येतीमुळे त्याला एक पाऊल मागे घ्यावं लागलंय. दरम्यान आम्ही दीपकला पूर्णपणे सहकार्य करत असून त्याला कोणत्याही पद्धतीने खेळण्यासाठी विनंती करत नसल्याचं बीसीसीआयने सांगितलंय.

दक्षिण आफ्रिका 20 टीम | एडेन मार्करम (कर्णधार), बार्टमॅन, मॅथ्यू ब्रीटक्जे, नांद्रे बर्गर, डोनोवॅन फरेरिया, रीजा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, डेविड मिलर, एंडिले फेहलुकवायो, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, लिजाड विलियम्स, गेराल्ड कोएत्झी, मार्को जानेसन आणि लुंगी एन्गिडी. (शेवटच्या तिघांना पहिल्या 2 सामन्यांसाठी संधी)

टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया | सूर्यकुमार यादव (कॅप्टन), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), यशस्वी जयसवाल, शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि दीपक चाहर.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.