IND vs SA: “गेल्या 4…”, वर्ल्ड कप विजयानंतर कॅप्टन रोहित शर्माने काय म्हटलं?
T20 World Cup Final Rohit Sharma Post Match Presentation: टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वात इतिहास रचत अखेर 17 वर्षांनी टी 20 वर्ल्ड कप जिंकत क्रिकेट चाहत्यांची प्रतिक्षा संपवली आहे. या विजयानंतर रोहित काय म्हणाला? जाणून घ्या.
रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने इतिहास रचला आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी थरारक विजय मिळवत 11 वर्षांनी आययीसी स्पर्धेतं विजेतेपद आणि 17 वर्षांनी टी 20 वर्ल्ड कप जिंकला. टीम इंडियाने सलग 8 सामने जिंकत वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं. एका क्षणाला गमावलेल्या सामन्यात भारतीय संघाने दणक्यात कमबॅक करत दक्षिण आफ्रिकेच्या तोंडातील विजयाचा घास हिसकावून घेतला. टीम इंडियाने विराट कोहलीच्या 76 धावांच्या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेला 177 धावांचं आव्हान दिलं होतं. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 20 ओव्हरमध्ये 8 बाद 169 धावांवर रोखलं. रोहित शर्माचा खेळाडू म्हणून हा दुसरा तर कर्णधार म्हणून पहिला टी 20 वर्ल्ड कप विजय ठरला. रोहित शर्मा या ऐतिहासिक विजयानंतर काय म्हणाला?जाणून घेऊयात.
रोहित शर्मा काय म्हणाला?
“गेल्या चार वर्षात आम्ही जे अनुभवले ते सांगणं खूप कठीण आहे. पडद्यामागे एक संघ म्हणून आम्ही खूप मेहनत घेतली. हे आम्ही आज जे केलंय ते एका दिवसात झालेलं नाही, त्यामागे गेल्या 4 वर्षांची मेहनत आहे. खूप दबावाखाली खेळलो. दबावाखाली काय करावं लागेल हे मुलांना (खेळाडूंना उल्लेखून) समजतं”, असं रोहितने म्हटलं.
टीम इंडिया ‘अजिंक्य’
दरम्यान टीम इंडिया या टी 20 वर्ल्ड कप 2024 मध्ये अजिंक्य राहिली. टीम इंडियाने साखळी फेरीतील 3, सुपर 8 मधील 3 सेमी फायनल असे एकूण सलग 7 सामने जिंकून फायनलमध्ये प्रवेश मिळवला. तर त्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेवर मात करत वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं. दक्षिण आफ्रिकाही या स्पर्धेत फायनलपर्यंत पोहचेपर्यंत अजिंक्य होती. मात्र अंतिम फेरी विजय मिळवून त्यांना चोकर्सचा शिक्का हटवता आला नाही.
कॅप्टन रोहितने इतिहास रचला
Two Icons! 🫡
Two T20 World Cup-Winning Captains 🏆 🏆
One PROUD Nation 🇮🇳
MS Dhoni 🤝 Rohit Sharma #T20WorldCup | #TeamIndia | #SAvIND | @msdhoni | @ImRo45 pic.twitter.com/oDdcYDm94G
— BCCI (@BCCI) June 29, 2024
दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, नॉर्खिया नॉर्टजे आणि तबरेझ शम्सी.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह.