Hardik Pandya: वर्ल्ड चॅम्पियन होताच हार्दिक भावूक, म्हणाला “मी 6 महिने..”

| Updated on: Jun 30, 2024 | 8:07 AM

Hardik Pandya Emotional: टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वात आयसीसी टी 20 वर्ल्ड कप जिंकला. या स्पर्धेत उपकर्णधार हार्दिक पंड्याने अफलातून कामगिरी केली. हार्दिक पंड्या विजयानंतर भावूक झाला.

Hardik Pandya: वर्ल्ड चॅम्पियन होताच हार्दिक भावूक, म्हणाला मी 6 महिने..
hardik pandya emotional
Follow us on

हार्दिक पंड्या, टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर. हार्दिकसाठी गेली काही महिने प्रचंड संघर्षाची राहिली. आयपीएलच्या 17 व्या मोसमासाठी रोहित शर्माला हटवून हार्दिकला कॅप्टन्सी देण्यात आली. हार्दिकला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. हार्दिकला कॅप्टन म्हणून आपली छाप सोडता न आल्याने त्यावरुन टीका करण्यात आली. त्यानंतर हार्दिकचं त्याची पत्नी नताशासह खटके उडाले असून दोघेही विभक्त होणार असल्याची चर्चा रंगली. त्यामुळे हार्दिकसाठी गेली काही महिने फारच अडचणीची आणि कसोटी घेणारी होती. मात्र हार्दिकने त्याचा आपल्या कामगिरीवर काडीमात्र परिणाम होऊ दिला नाही. हार्दिकने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत हे सिद्ध करुन दाखवलं. हार्दिकने या संपूर्ण स्पर्धेत बॅटिंग आणि बॉलिंगने दमदार कामगिरी केली. हार्दिकने या स्पर्धेत 144 धावा आणि 11 विकेट्स घेतल्या. टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वात टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हार्दिकला 2023 वर्ल्ड कप फायनलची आठवण झाली आणि त्याने वेदना व्यक्त केल्या.

हार्दिकने काय म्हटलं?

हा भावनिक क्षण आहे आणि साऱ्या देशाला हेच अपेक्षित होतं. सहा महिन्यानंतर काही खास झालं आणि मी कुणाला एका शब्दात काही म्हटलं नाही. काही गोष्टी या योग्य राहिल्या नाहीत. मात्र मला विश्वास होता की आपली वेळ नक्कीच येईल. आम्ही कायम शांत राहिलो आणि स्वत:वर विश्वास ठेवला. तसेच स्वत:वर दबाव येऊ दिला नाही. शेवटच्या ओव्हरमध्ये मला माहित होतं की प्लानवर कायम रहायचं आहे. दबावाच्या स्थितीत माझ्या रनअपचा वेग वाढला होता. मात्र दबावात असं होतं”, असं हार्दिकने म्हटलं.

सामन्याबाबत थोडक्यात

दरम्यान टीम इंडियाने या दक्षिण आफ्रिके विरुद्ध अंतिम सामन्यात विराट कोहली याच्या 76 आणि 47 धावा केल्या. या जोरावर टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 176 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेने या प्रत्युत्तरात हेन्रिक क्लासेनच्या 27 बॉलमध्ये 2 चौकार आणि 5 सिक्सच्या मदतीने 52 धावांची खेळी केली. मात्र निर्णायक क्षणी हार्दिक पंड्याने क्लासेनची शिकार केली. त्यामुळे टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेला 20 ओव्हरमध्ये 8 बाद 169 धावांवर रोखलं आणि टीम इंडियाने हा सामना 7 धावांनी जिंकला. टीम इंडियाकडून हार्दिक पंड्याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्खिया आणि तबरेझ शम्सी.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह.