SA vs IND Test Series | टीम इंडियाचा स्टार कसोटी मालिकेतून आऊट, नक्की कारण काय?
South Africa vs India Test Series | टीम इंडिया रोहित शर्मा याच्या नेतृत्वात कसोटी मालिका खेळणार आहे. त्याआधी टीम इंडियाच्या गोटातून वाईट बातमी समोर आली आहे. नक्की काय झालंय, जाणून घ्या.
मुंबई | टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टीम इंडियाने 3 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत सोडवली. त्यानंतर रविवार 17 डिसेंबरपासून 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात झालीय. त्याआधी 16 डिसेंबरला दीपक चाहर याने कौटुंबिक कारणामुळे वनडे सीरिजमधून आपलं नाव मागे घेतलं. तर कसोटी मालिकेतून मोहम्मद शमी दुखापतीमुळे बाहेर पडला. एकाच वेळी 2 खेळाडूंचं मालिकेत न खेळणं हे टीम इंडियासाठी झटक्यापेक्षा कमी नाही. शमी आणि चाहरला सीरिजमधून बाहेर पडून 24 तास उलटत नाही, तोवर टीम इंडियाला आणखी एक झटका लागला आहे.
टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर बॅट्समन ईशान किशन याने दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या कसोटी मालिकेतून माघार घेतली आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. ईशानने वैयक्तिक कारणामुळे या मालिकेतून माघार घेत असल्याचं बीसीसीआयने म्हटलंय. आता ईशानच्या जागी विकेटकीपर बॅट्समनला संधी देण्यात आली आहे. बीसीसीआयने एक्स अकाउंटवरुन (ट्विटर) याबाबतची माहिती दिली आहे.
बीसीसीआयने काय म्हटलंय?
बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, ईशान किशन याने वैयक्तिक कारण सांगत दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या कसोटी मालिकेतून मुक्त करण्याची विनंती केली होती. त्यानुसार ईशानला टेस्ट सीरिजमधून मुक्त करण्याची विनंती मान्य करण्यात आली आहे. तर आता दक्षिण आफ्रिके विरुद्ध ईशानच्या जागी केएस भरत याला संधी देण्यात आली आहे.
ईशान किशन याची विनंती मान्य, केएसला फायदा
🚨 UPDATE 🚨: Ishan Kishan withdrawn from #TeamIndia’s Test squad. KS Bharat named as replacement. #SAvIND
Details 🔽https://t.co/KqldTEeD0T
— BCCI (@BCCI) December 17, 2023
कसोटी मालिकेबाबत थोडक्यात
दरम्यान दक्षिण आफ्रिका-टीम इंडिया यांच्यात एकूण 2 सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेला 26 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना हा 26 ते 30 डिसेंबर रोजी सेंच्युरियन येथे आयोजित करण्यात आला आहे. तर दुसरा सामना हा 3 ते 7 जानेवारी दरम्यान केप टाऊनमध्ये पार पडेल. या कसोटी मालिकेत रोहित शर्मा टीम इंडियाचं आणि टेम्बा बवुमा दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व करणार आहे.
टेस्ट सीरिजसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, प्रसीध कृष्णा आणि केएस भरत (विकेटकीपर).