SA vs NED Rain | दक्षिण आफ्रिका विरुद्ध नेदरलँड्स सामन्यात पावसामुळे लेटमार्क, सामना किती वाजता सुरु होणार?
South Africa vs Netherland Rain | ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामना पावसामुळे थांबवण्यात आला होता. त्यानंतर आता दक्षिण आफ्रिका विरुद्ध नेदरलँड्स सामना वेळेवर सुरु होऊ शकलेला नाही.
धर्मशाळा | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील 15 वा सामना आज मंगळवार 17 ऑक्टोबर रोजी खेळवण्यात येत आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिका विरुद्ध नेदरलँड्स आमनेसामने आहेत. सामन्याचं आयोजन हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम धर्मशाळा इथे करण्यात आलं आहे. सामन्याला वेळापत्रकानुसार दुपारी 2 वाजजा सुरुवात होणार होती. तर दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार होता. मात्र ओल्या खेळपट्टीमुळे टॉस आणि सामना सुरु होण्यास विलंब होणार आहे.
क्रिकेट चाहते सामन्याआधी टॉसच्या प्रतिक्षेत होते. दुपारी दीड वाजता नेहमीप्रमाणे टॉस होतो. मात्र पावसामुळे खेळपट्टी ओली झाली. त्यामुळे टॉसला विलंब झाला. त्यामुळे सामनाल्याही विलंबाने सुरुवात होणार असल्याची माहिती देण्यात आली. मिळालेल्या माहितानुसार, टॉस दुपारी 2 वाजता होणार आहे. तर सामन्याला 2 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. थोडक्यात काय तर सामना नेहमीपेक्षा 30 मिनिटांच्या विलंबाने सुरु होईल.
कोण जिंकणार मॅच?
दरम्यान दक्षिण आफ्रिका टीमने या स्पर्धेत आतापर्यंत खेळलेल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे नेदरलँड्सचा धुव्वा उडवत न्यूझीलंड, टीम इंडियानंतर दक्षिण आफ्रिकेचा विजयी हॅटट्रिक पूर्ण करण्याचा मानस असणार आहे. तर नेदरलँड्स 2022 मधील टी 20 वर्ल्ड कप प्रमाणे उलटफेर करण्याच्या हिशोबाने मैदानात उतरणार आहे. नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत टी 20 वर्ल्ड कपमधून बाहेर केलं होतं.
पावसामुळे सामन्याचा खेळखंडोबा
Stage is set, after a rainy start the skies have cleared up and the covers are coming off 🙌
The toss has been delayed until further notice in Dharamshala #CWC23 #BePartOfIt pic.twitter.com/QUxoo0AhpH
— Proteas Men (@ProteasMenCSA) October 17, 2023
दक्षिण आफ्रिका टीम | टेम्बा बावुमा (कॅप्टन), गेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, अँडिले फेहलुक्वायो, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी, रॅसी ड्युसेन, विल्यम ड्युसेन आणि लीडर वॅन्सी .
नेदरलँड्स क्रिकेट टीम | स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), मॅक्स ओ’डॉड, बास डी लीडे, विक्रम सिंग, तेजा निदामानुरु, पॉल व्हॅन मीकेरेन, कॉलिन अकरमन, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, लोगन व्हॅन बीक, आर्यन दत्त, रायन क्लेन, वेस्ली बॅरेसी, साकिब झुल्फिकार, शरीझ अहमद आणि सायब्रँड एंजेलब्रेक्ट.