SA vs PAK : दक्षिण आफ्रिकेला मालिका विजयाची संधी, पाकिस्तानसाठी ‘करो या मरो’, कोण जिंकणार?

South Africa vs Pakistan 2nd T20i Live Streaming: दक्षिण आफ्रिकेने या 3 सामन्यांच्या मालिकेत विजयी सुरुवात करत 1-0 ने आघाडी घेतलीय. त्यामुळे पाकिस्तानसाठी दुसरा सामना हा 'करो या मरो' असा आहे.

SA vs PAK : दक्षिण आफ्रिकेला मालिका विजयाची संधी, पाकिस्तानसाठी 'करो या मरो', कोण जिंकणार?
South Africa vs Pakistan t20i seriesImage Credit source: ProteasMenCSA and PCB X Account
Follow us
| Updated on: Dec 13, 2024 | 1:08 AM

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तान क्रिकेट टीमसाठी दुसरा टी 20I सामना ‘करो या मरो’ असा आहे. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या सामन्यात 11 धावांनी विजय मिळवला होता. दक्षिण आफ्रिकेने यासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला दुसर्‍या सामन्यासह मालिका जिंकण्याची दुहेरी संधी आहे. तर पाकिस्तानसमोर मालिकेतील आव्हान राखण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवणं बंधनकारक आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना दुसर्‍या सामन्यात चांगलीच चुरस पाहायला मिळू शकते. दुसऱ्या सामन्याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

दुसऱ्या सामन्याबाबत महत्त्वाची माहिती

हेनरिक क्लासेन हा दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व करणार आहेत. तर मोहम्मद रिझवान याच्याकडे पाकिस्तानच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. उभयसंघातील दुसऱ्या सामन्याचं आयोजन हे सुपरस्पोर्ट पार्क, सेंच्युरियन येथे करण्यात आलं आहे. हा सामना शुक्रवारी 13 डिसेंबर रोजी होणार आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 9 वाजता टॉस होईल. सामना टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर सामना पाहायला मिळेल.

दक्षिण आफ्रिकेची मालिका जिंकण्यासाठी जोरदार तयारी

दरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी दुसर्‍या सामन्याआधी जोरदार सराव केला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या या सरावाचा व्हीडिओ अधिकृत एक्स या सोशल मिडिया हँडलवरुन पोस्ट करण्यात आला आहे.

पाकिस्तान टीम: मोहम्मद रिझवान (कॅप्टन आणि विकेटकीपर), बाबर आझम, सैम अयुब, उस्मान खान, तय्यब ताहिर, शाहीन आफ्रिदी, इरफान खान, अब्बास आफ्रिदी, सुफियान मुकीम, हारिस रौफ, अबरार अहमद, सलमान आगा, ओमेर युसूफ, जहांदद खान आणि मोहम्मद हसनैन.

दक्षिण आफ्रिका टीम : हेनरिक क्लासेन (कॅप्टन आणि विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, रॅसी व्हॅन डर डुसेन, मॅथ्यू ब्रेट्झके, डेव्हिड मिलर, डोनोव्हन फरेरा, जॉर्ज लिंडे, अँडिले सिमेलेन, न्काबायोम्झी पीटर, क्वेना माफाका, ओटनील बार्टमन, दयान गॅलिम्सी, ताब्रायझम पॅट्रिक क्रुगर आणि रायन रिकेल्टन.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.