पहिला सामना, पहिला दिवस-पहिलं शतक, टेम्बा बावुमाची सेंच्युरी, कॅप्टनची पाकिस्तानविरुद्ध कडक सुरुवात
Temba Bavuma Century : टेम्बा बावुमा याने पाकिस्तान विरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी शतक ठोकलं आहे. टेम्बाचं हे पाकिस्तानविरुद्धचं पहिलंवहिलं शतक ठरलं.
SA vs PAK 2nd Test : दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा याने 2025 या नववर्षाची अप्रतिम, अविस्मरणीय आणि अफलातून अशी सुरुवात केली आहे. टेम्बाने पाकिस्तान विरूद्धच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या तर नववर्षातील पहिल्या सामन्यातील पहिल्या दिवशी (3 जानेवारी) शतक झळकावलं आहे. टेम्बाच्या कसोटी कारकीर्दीतील हे एकूण चौथं, पाकिस्तानविरुद्धचं आणि नववर्षातील हे पहिलं शतक ठरलं आहे. टेम्बाने शतक केल्यानंतर शानदार जल्लोष केला. टेम्बाच्या शतकानंतर स्टेडियममधील क्रिकेट चाहत्यांनी आणि सहकाऱ्यांनी कर्णधारांचं टाळ्या वाजवून अभिनंदन केलं.
टेम्बाने डावातील 74 व्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर सिंगल घेत शतक पूर्ण केलं. टेम्बाने 167 बॉलमध्ये 59.88 च्या एव्हरेजने 2 सिक्स आणि 9 फोरसह हे शतक पूर्ण केलं. मात्र टेम्बाला शतकानंतर फार वेळ मैदानात टिकता आलं नाही. टेम्बाकडे पहिल्या दिवशी नाबाद परतण्याची संधी होती. मात्र टेम्बा शतकानंतर 6 धावा करुन आऊट झाला. टेम्बाला सलमान आघा याने विकेटकीपर मोहम्मद रिझवान याच्या हाती कॅच आऊट केलं. टेम्बा 106 धावांवर आऊट झाला. यासह टेम्बा आणि रायन रिकेल्टन ही जोडी फुटली.
चौथ्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी
दरम्यान टेम्बा आणि रायन या जोडीने चौथ्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी केली. ट्रिस्टन स्टब्स आऊट झाल्याने दक्षिण आफ्रिकेची 3 बाद 72 अशी स्थिती झाली होती. मात्र त्यानंतर टेम्बा आणि रायन या दोघांनी जम बसवला आणि दक्षिण आफ्रिकेला मजबूत स्थिती आणून ठेवलं. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 235 विक्रमी भागीदारी केली.
कर्णधार टेम्बा बावुमाचं शतक
Another captain’s knock from Temba Bavuma 🫡 #WTC25 | 📝 #SAvPAK: https://t.co/L7gnQUIBxW pic.twitter.com/N7qJsgI37Q
— ICC (@ICC) January 3, 2025
दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन : टेम्बा बावुमा (कर्णधार), एडन मार्कराम, रायन रिकेल्टन, विआन मुल्डर, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकेटकीपर), मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा आणि क्वेना माफाका.
पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन : शान मसूद (कर्णधार), सैम अयुब, बाबर आझम, कामरान गुलाम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सलमान आगा, आमेर जमाल, मीर हमजा, खुर्रम शहजाद आणि मोहम्मद अब्बास