SA vs PAK : दक्षिण आफ्रिकेकडे व्हाईटवॉश करण्याची संधी, पाकिस्तान मालिकेत बरोबरी करणार?

South Africa vs Pakistan 2nd Test Live Streaming : दक्षिण आफ्रिका या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. आता दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडे पाकिस्तानला व्हाईटवॉश करण्याची संधी आहे.

SA vs PAK : दक्षिण आफ्रिकेकडे व्हाईटवॉश करण्याची संधी, पाकिस्तान मालिकेत बरोबरी करणार?
south africa vs pakistan 2nd test live streamingImage Credit source: ProteasMenCSA and PCB X Account
Follow us
| Updated on: Jan 02, 2025 | 11:50 PM

पाकिस्तान क्रिकेट टीम दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यातील शेवटचा कसोटी सामना खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. पाकिस्तानने कसोटी मालिकेआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी 20i आणि एकदिवसीय मालिका खेळली. यजमानांनी 3 सामन्यांची टी 20i मालिका 2-0 अशा फरकाने जिंकली. त्यानंतर पाकिस्तानने पलटवार करत दक्षिण आफ्रिकेला वनडे सीरिजमध्ये 3-0 ने क्लिन स्वीप केलं. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानवर पहिल्या कसोटीत 2 विकेट्सने थरारक विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेने या विजयासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता दक्षिण आफ्रिका या दुसऱ्या सामन्यासाठी तयार आहे.

दक्षिण आफ्रिका या 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. पाकिस्तानला ही मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी दुसऱ्या सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. दुसरा सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल? हे आपण जाणून घेऊयात.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान दुसरा कसोटी सामना केव्हा?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान दुसरा कसोटी सामना 3 ते 7 जानेवारीदरम्यान खेळवण्यात येणार आहे.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान दुसरा कसोटी सामना कुठे?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान दुसरा कसोटी सामना न्यूलँड्स, केप टाऊन येथे होणार आहे.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान दुसऱ्या कसोटी सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान दुसऱ्या कसोटी सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरुवात होईल. तर 1 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान दुसरा कसोटी सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येईल?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान दुसरा कसोटी सामना टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर मोबाईलवर लाईव्ह मॅचचा थरार हा जिओ सिनेमा एपवरुन अनुभवता येईल.

पाकिस्तान संघ : शान मसूद (कर्णधार), सैम अयुब, बाबर आझम, कामरान गुलाम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सलमान आगा, आमेर जमाल, नसीम शाह, खुर्रम शहजाद, मोहम्मद अब्बास, अब्दुल्ला शफीक, मीर हमजा, नोमान अली आणि हसीबुल्ला खान.

दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन : टेम्बा बावुमा (कर्णधार), एडन मार्कराम, वियान मुल्डर, रायन रिकेल्टन, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, कायल वेरेन (विकेटकीपर), मार्को जान्सेन, केशव महाराज, कागिसो रबाडा आणि क्वेना माफाका.

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.