Rain : पाऊस आणि खराब हवामानामुळे तिसरा सामना रद्द, चाहत्यांची निराशा
Cricket Match : खराब हवामान आणि पावसामुळे तिसरा सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांची निराशा झाली आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसऱ्या कसोटीतील पहिल्या दिवसाचा (14 डिसेंबर) बहुतांश खेळ हा पावसामुळे वाया गेला. पहिल्या दिवशी फक्त 13.2 ओव्हरचाच खेळ होऊ शकला. त्यानंतर अवघ्या काही तासांनंतर पावसामुळे आणि खराब हवामानामुळे दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील तिसरा आणि अंतिम टी 20i सामना हा रद्द करण्यात आला आहे. पाऊस थांबण्याची प्रतिक्षा करण्यात आली. मात्र परिस्थिती हाताबाहेर गेल्याचं समजताच टॉसशिवाय सामना रद्द करण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं. याबाबतची माहिती दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाकडून सोशल मीडियावरुन देण्यात आली.
उभयसंघातील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यांचं आयोजन हे द वांडरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग येथे करण्यात आलं होतं. भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजता टॉस होणं अपेक्षित होतं. मात्र खराब हवामानामुळे टॉसला विलंब झाला. तसेच सातत्याने पाऊस सुरु होता. रात्री 11 वाजून 8 मिनिटांपर्यंत प्रतिक्षा करण्यात आली. पाऊस थांबला होता. त्यामुळे सामना होईल अशी चाहत्यांना आशा होती. मात्र थोड्या वेळात सामना पावसामुळे रद्द करण्याचं जाहीर करण्यात आलं. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांची हिरमोड झाली.
यजमान दक्षिण आफ्रिका या 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडीवर होती. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेकडे हा सामना जिंकून पाकिस्तानचा 3-0 ने धुव्वा उडवण्याची संधी होती. तर पाकिस्तानचा हा सामना जिंकून लाज राखण्याचा प्रयत्न होता. मात्र पावसाच्या जोरदार बॅटिंगसमोर कुणाचंच काही चालंलं नाही. दक्षिण आफ्रिकेने अशापक्रारे 3 सामन्यांची मालिका 2-0 अशा फरकाने आपल्या नावे केली आहे.
तिसरा सामना पावसामुळे आणि खराब हवामानामुळे रद्द
🟢🟡Match Result
Due to inclement weather conditions, the 3rd and final match was abandoned without a ball bowled.⛈️
South Africa claim the 3-Match Series 2-0🏆🇿🇦#WozaNawe #BePartOfIt #SAvPAK pic.twitter.com/rzO41SvEhe
— Proteas Men (@ProteasMenCSA) December 14, 2024
दक्षिण आफ्रिका टीम : हेनरिक क्लासेन (कर्णधार आणि विकेटकीपर), रायन रिकेल्टन, रीझा हेंड्रिक्स, मॅथ्यू ब्रेट्झके, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, डोनोव्हन फरेरा, जॉर्ज लिंडे, दयान गॅलीम, न्काबायोमझी पीटर, क्वेना माफाका, ओट्टनेल केर, पॅटनील, पॅटनेल, डेविड बॅरसी, पॅटनेल बॅरेसी आणि आंदिले सिमेलें.
पाकिस्तान टीम : मोहम्मद रिझवान (कर्णधार आणि विकेटकीपर), सैम अयुब, बाबर आझम, उस्मान खान, तय्यब ताहिर, इरफान खान, शाहीन आफ्रिदी, अब्बास आफ्रिदी, जहांदद खान, हारिस रौफ, अबरार अहमद, सलमान आगा, ओमेर युसूफ, मोहम्मद हसनैन आणि सुफियान मुकीम.