SA vs SL 2nd Test : दक्षिण आफ्रिकेला मालिका विजयाची संधी, श्रीलंका रोखणार?
South Africa vs Sri Lanka 2nd Test Live Streaming : दक्षिण आफ्रिका या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे श्रीलंकेसमोर हा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याचं आव्हान आहे.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका यांच्यात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. दक्षिण आफ्रिका या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. दक्षिण आफ्रिकेने या मालिकेतील विजयी सुरुवातीसह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 पॉइंट्स टेबलमध्ये मोठी झेप घेतली. दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या स्थानी झेप घेतली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची तिसऱ्या स्थानी घसरण झाली. दक्षिण आफ्रिकेच्या या विजयामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठीची चुरुस आता वाढली आहे. त्यामुळे आता प्रत्येक सामना डब्ल्यूटीसी फायनलच्या हिशोबाने निर्णायक असणार आहे.
आता दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसरा सामना 5 डिसेंबरपासून खेळण्यात येणार आहे. दक्षिण आफ्रिकेकडे या सामन्यासह मालिका जिंकण्याची संधी आहे. तसेच पॉइंट्स टेबलमधील दुसरं स्थान भक्कम करण्याची नामी संधी आहे. तर श्रीलंकेसमोर सामना जिंकत मालिका बरोबरीत सोडवण्यासह डब्ल्यूटीसी फायनलमधील आव्हान कायम ठेवण्याचं आव्हान असणार आहे. त्यामुळे या सामन्यात दोन्ही संघाच चांगलीच चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका दुसरा कसोटी सामना केव्हा?
दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका दुसरा कसोटी 5 ते 9 डिसेंबर दरम्यान खेळवण्यात येणार आहे.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका दुसरा कसोटी सामना कुठे?
दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका दुसरा कसोटी सामना सेंट जॉर्ज पार्क Gqeberha येथे खेळवण्यात येणार आहे.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या कसोटी सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या कसोटी सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरुवात होईल.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका दुसरा कसोटी सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?
दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका दुसरा कसोटी सामना टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्कवरील चॅनेवल्सवर पाहायला मिळेल. तर मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर सामना पाहता येईल.
दक्षिण अफ्रीका: टेम्बा बावुमा (कर्णधार), डेविड बेडिंगहॅम (विकेटकीपर), जेराल्ड कोएत्झी, टोनी डी झॉर्जी, मार्को यान्सेन, केशव महाराज, एडेन मार्करम, मॅथ्यू ब्रीट्जके, सेनुरन मुथुसामी, डेन पॅटरसन, कगिसो रबाडा, ट्रिस्टन स्टब्स, रयान रिकेल्टन (विकेटकीपर) आणि कायल वेरिन (विकेटकीपर).
श्रीलंका टीम : धनंजय डी सिल्वा (कॅप्टन), पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, दिनेश चांदीमल, अँजलो मॅथ्यूज, कुसल मेंडीस (विकेटकीपर), कामिंदु मेंडिस, ओशादा फर्नांडो, सदीरा समरविक्रमा (विकेटकीपर), प्रभात जयसूर्या, निशान पेइरिस, लसिथ एम्बुलडेनिया, मिलान रत्नायके, असिथा फर्नांडो, विश्वा फर्नांडो, लाहिरू कुमारा आणि कासुन राजिथा.