कसोटी सामन्यामध्ये कर्णधाराच्या नावावर झाला भयंकर रेकॉर्ड, देशाचा असा पहिलाच कर्णधार!
वेस्ट इंडिजविरूद्ध सुरू असलेल्या कसोटी सामन्यामध्ये त्याने नकोशा 5 भयानक विक्रमांना गवसणी घातली आहे.
मुंबई : दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू टेंबा बावुमा याच्याकडे कसोटी संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. कर्णधार म्हणून पहिला सामना खेळणाऱ्या टेंबा बावुमाच्या नावावर खराब रेकॉर्डची नोंद झाली आहे. पहिल्या कसोटीमधील दोन्ही डावात तो चार चेंडूही खेळू शकला नाही. त्यामुळे टेंबा बावुमा हा कर्णधारपद स्वीकाल्यानंतर खराब रेकॉर्डने चर्चेत आला आहे. इतकंच नाहीतर अशी पाच कारणे आहेत ज्यामुळे त्याचं नाव चर्चेत आलं आहे. कर्णधार म्हणून खेळताना त्याने भयानक विक्रमांना गवसणी घातली आहे. वेस्ट इंडिजविरूद्ध सुरू असलेल्या कसोटी सामन्यामध्ये त्याच्या नावावर नकोशा विक्रमची नोंद झाली आहे.
कसोटीमध्ये कर्णधार म्हणून पहिल सामना खेळताना दोन्ही डावांमध्ये खातेही उघडता आलं नाही. आफ्रिकेचा असा पहिला कर्णधार बनला आहे ज्याला दोन्ही डावांमध्ये आपलं खातंही उघडता आलेलं नाही. पहिल्या डावात त्याने 2 बॉलमध्ये 0 धावा तर दुसऱ्या डावातही पहिल्याच बॉलवर भोपळा न फोडता बाद झाला.
टेम्बा बावुमाने सेंच्युरियन इथे सुरु असलेल्या कसोटी सामन्यामध्ये दोन्ही डावांमध्ये मिळून एकूण तीन बॉल खेळले. कसोटी सामन्यात कर्णधाराने खेळलेले हे सर्वात कमी बॉल आहेत. पहिल्या डावात दोन बॉल तर तो बाद झाला म्हणजे त्यातील एकच बॉल त्याने खेळला त्यावरही त्याला रन काढता आला नाही.
टेम्बा बावुमाच्या अगोदर आफ्रिकेचा पहिला कर्णधार असा खेळाडू आहे ज्याचं नाव ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही. 2016 मध्ये एबी डिव्हिलियर्स हा दोन्ही डावांमध्ये शून्यावर बाद झाला होता. तर दुसरा कर्णधार 2018 मध्ये फाफ डू प्लेसिस यालाही भोपळा फोडता आला नव्हता.
जागतिक क्रिकेटमध्ये कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये शून्यावर बाद होणार टेम्बा बावुमा 25 वा खेळाडू आहे. तर कर्णधार म्हणून पहिल सामना खेळणारा तो चौथा फलंदाज ठरला आहे. तर याआधी मार्क टेलर, रशीद लतीफ आणि हबीबुल बशर यांच्या नावावर या खराब रेकॉर्डची नोंद आहे.