मुंबई: क्रिकेटचा मक्का म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या (Lords) मैदानात गुरुवारी भारत आणि इंग्लंडचे (IND vs ENG) संघ आमने-सामने उतरले. या सामन्याच्यावेळी चाहत्यांनी मैदानात जे दृश्य बघितलं, ते पाहून त्यांनी आपला आनंद व्यक्त केला. हा सामना पाहण्यासाठी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) दोघे उपस्थित होते. दोघांना सामन्यादरम्यान एकत्र स्टँडसमध्ये पाहण्यात आलं. दोघांनी महान फलंदाजांमध्ये गणना होते. दोघे सलामीवीर म्हणून यशस्वी ठरले आहेत.
आज अनेक वर्षानंतर स्टेडियम मध्ये दोघे एकत्र दिसले. सचिन आणि सौरव प्रेक्षक गॅलरीत बसून सामन्याचा आनंद लुटत होते. कॅमेरा या दोघांकडे वळताच लॉर्ड्सच्या मैदानील भारतीय चाहत्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. जवळपास 30 सेकंद कॅमेरा दोघांवर होता. यावेळी प्रेक्षकांनी एकच कल्ला केला. सचिन-सौरवचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. याआधी 8 जुलैला लंडन मध्ये सौरवचा वाढदिवस झाला. त्यावेळी दोघे एकत्र दिसले होते.
— Guess Karo (@KuchNahiUkhada) July 14, 2022
सौरव गांगुलीची भारताच्या यशस्वी कर्णधारांमध्ये गणना होते. लॉर्ड्सशी सौरव गांगुलीच एक वेगळं नात आहे. याच मैदानावर सौरव गांगुलीने कसोटी क्रिकेट मध्ये डेब्यु केला होता. भारताने याच मैदानावर 2002 साली नॅटवेस्ट ट्रॅाफी जिंकली. त्यावेळी सौरवने लॉर्ड्सच्या बाल्कनी मध्ये उभं राहून आपला टी शर्ट काढून फिरवला होता. त्यासाठी सौरव गांगुलीवर बरीच टीका सुद्धा झाली.
The Great Sachin Tendulkar At The Home Of Cricket. pic.twitter.com/qMdT6gDmYb
— Prof. Boies Pilled Bell ? (@Im_Perfect45) July 14, 2022
सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये 100 शतकं झळकावली आहेत. जवळपास प्रत्येक मैदानावर त्याने शतक झळकावलं आहे. पण लॉर्ड्स वर शतक झळकावण सचिनला जमलं नाही.