Rishabh Pant Accident : ऋषभ पंतच्या अपघातामुळे सचिन-सेहवागला मजबूत झटका
ऋषभ पंतच्या (Rishabh Pant Accident) अपघाताच्या वृत्तामुळे आजी माजी क्रिकेटरांना मोठा धक्का बसला आहे.
Rishabh Pant News : टीम इंडियाचा आक्रमक विकेटकीपर बॅट्मन ऋषभ पंतच्या अपघातामुळे (Rishabh Pant) क्रिकेट विश्व हादरलंय. ऋषभला अपघातात जबर मार लागलाय. अपघाताची तीव्रता पाहता पंतला आगामी आयपीएल आणि वर्ल्ड कपमध्ये खेळता येईल का याबाबतही शंका उपस्थित होत आहेत. तर दुसऱ्या बाजूला पंतच्या अपघाताच्या वृत्तामुळे आजी माजी क्रिकेटरांना मोठा धक्का बसला आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) यांनाही धक्का बसलाय. पाकिस्तानमध्येही पंतच्या अपघाताचं वृत्त वेगाने पसरलंय. पंतची तब्येत लवकर बरी व्हावी यासाठी पार्थना केली जात आहे. (sachin tendulkar and virender sehwag shocked after rishabh pant accident tweet viral on social media)
तेंडुलकर-सेहवाग या दोघांनी ऋषभसाठी ट्विट केलंय. “तु लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी मी पार्थना करतो ऋषभ पंत. माझ्या पार्थना तुझ्यासोबत आहे”, असं ट्विट सचिनने केलंय. तर “तुझी तब्येत झपाट्याने सुधारणा व्हावी यासाठी मी देवाकडे पार्थना करतो. तु लवकर बरा व्हावास”, असं सेहवागने ट्विटमध्ये म्हटलंय.
शाहिन आफ्रिदी काय म्हणाला?
पाकिस्तानतूनही पंतच्या उत्तम आरोग्यासाठीही पार्थना केल्या जात आहेत. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदीने पंत बरा व्हावा यासाठी अल्लाहकडे दुवा मागितली आहे. “ऋषभ पंतसाठी मी दुआ मागतोय”, असं शाहिनने ट्विटमध्ये म्हटलंय. याशिवाय सुरेश रैना आणि गौतम गंभीर या दोन दिग्ग्जांनीही पंतच्या आरोग्यासाठी पार्थना केलीय.
Wishing you a very speedy recovery @RishabhPant17. My prayers are with you.
— Sachin Tendulkar (@sachin_rt) December 30, 2022
Wishing dear @RishabhPant17 a super speedy recovery. Bahut hi Jald swasth ho jaao.
— Virender Sehwag (@virendersehwag) December 30, 2022
Praying for @RishabhPant17
— Shaheen Shah Afridi (@iShaheenAfridi) December 30, 2022
अपघातावेळी नक्की काय झालं?
पंतची बीएमडबल्यू कार शुक्रवारी रात्री दिल्ली-डेहराडून मार्गावरील दुभाजकाला धडकली. यामुळे पंतला जबर मार लागला. पंत आपल्या घरी जात होता. पंतला अपघातानंतर स्थानिक रुग्णालयात दाखल करावं लागलं. ऋषभला डोकं, पाठ आणि पायावर मार लागलाय. मात्र सुदैवाने पंतची प्रकृती स्थिर आहे.